*कोरोनाने हरवला निकाल दिवसाचा आंनद*
*कोरोनाने हरवला निकाल दिवसाचा आंनद*

 

दि १ मे ,टीम सीएमन्यूज

ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे एक मे निकाल लागण्याचा दिवस. मात्र या निकाल दिवसाने विद्यार्थ्यांचा हिरमोड केला आहे .कदाचित त्यांच्या आयुष्यातील हा पहिला आणि शेवटचा ठरावा.
दरवर्षी साधारणतः 15 एप्रिल पर्यंत परीक्षा संपल्यानंतर एक मे ची सर्व मुले वाट पाहत असतात म्हणजेच निकालाचा दिवस इतरांसाठी तो महाराष्ट्र दिन ,काहींसाठी तो कामगार दिन असला तरी या चिमुकल्या बालकांसाठी निकालाचा दिवस असतो.

सकाळीच उठून अंघोळ करून आवरून सावरून ही विद्यार्थी आपल्या शाळेची वाट धरतात. शाळेत आल्यानंतर झेंडावंदन पार पडली की ते आतुरतेने वाट पाहत असतात ते आपल्या निकाल पत्रकाची. निकाल पत्रक हातात पडल्यानंतर जो आनंद या चिमुकल्यांना मिळतो बालकांना मिळतो, त्याची कल्पना करता येत नाही तू अनुभवावा लागतो. नेमका हाच आनंद या टाळेबंदी ने हिरावला आहे.
कोरोना विषाणूचा फटका या निकालाच्या दिनाला पण बसला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी घरातच अडकून पडले आहेत अशा परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे चिमुकल्या बालकांच्या हाती या दिवशी जो निकाल पडणार होता त्याचा अपेक्षाभंग झाला आहे.
कोरोना ने विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आंनद हिरावून घेतला असेच म्हणावे लागेल.

Share this story