Beed-copy- *कॉपीमुक्तीच्या ‘पॅटर्न’ला तडा ; आष्टी पॅटर्न ने डोके वर काढले*

 

बीड दि .27 फेब्रुवारी ।टीम सीएमन्यूज

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील कॉपीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रयत्न सुरू केले .मात्र त्यांच्या कॉपीमुक्तीच्या पॅटर्न ला तडा गेल्याचे समोर आले आहे .त्यामुळे आष्टी तालुक्यातील कॉपीचा आष्टी पॅटर्न पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे .

एकेकाळी आष्टी तालुक्यातील कॉपीचा पॅटर्न राज्यात गाजला .राज्यातून कॉपी करून पास होण्यासाठी आष्टी,शिरूर,या भागातील सीमेवरच्या उच्च माध्यमिक वर्गात प्रवेश घेत असत.त्यामुळे ऐन परीक्षेत हे नवखे नजरेस पडत.आजही काही प्रमाणात हीच स्थिती पहावयास मिळत आहे .या पॅटर्न वर मात करण्यासाठी राज्य सरकारने नगर जिल्हा शिक्षणाधिकारी यांचे पथक नेमले होते.या पॅटर्न ची राज्यभर कु प्रसिद्धी झाल्याने या भागातील शिक्षण संस्थांनी पुढे येऊन हे मोडून काढले पण आज पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे .
आज आष्टी तालुक्यातील बहुतांश बारावी परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेचा गणिताचा पेपर होता .तालुक्यातील काही केंद्र वगळता इतर ठिकाणी विद्यार्थी बिनधास्त पणे समोर कॉपी ठेऊन लिहताना दिसत आहेत.त्यामुळे तालुक्यातील केंद्रावर वरून वरून कीर्तन आतून तमाशा असे चित्र दिसत आहे.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांच्या नियुक्ती करताना दुसऱ्या केंद्राचे पर्यवेक्षक दिले,मात्र हे नियोजन फोल ठरविण्याचे काम केंद्रावरील वर्षानुवर्षे परीक्षेचे काम करणारे करत असल्याचे दिसत आहे .आता दहावीच्या परीक्षेत जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Share this story