*शाळापूर्व तयारी पंधरवाडा जाहीर ; शाळांच्या आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायत वर*
*शाळापूर्व तयारी पंधरवाडा जाहीर ; शाळांच्या आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायत वर*

 

बीड दि 16 जून टीम सीएम न्यूज

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण व शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन परिपत्रकानुसार शाळा सुरु करावयाच्या असल्याने त्यासाठी जिल्हा परिषदेने शाळापूर्व तयारी पंधरवाडा आयोजित करण्याचा आदेश जारी केला आहे.शाळा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायत वर टाकली आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शाळा संदर्भात आदेश जारी केल्याने आता बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आदेश काढून पंधरवाडा आयोजित करण्याचे आदेशीत केले आहे .

काय आहे पंधरवाडा

18 रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करणे.
19 रोजी स्थनिक पदाधिकारी यांचे समवेत समन्वय बैठक आयोजित करणे.
20 रोजी पालक सभा आयोजित करून ,पालकांची भीती दूर करणे.
22 रोजी प्रति तीन शिक्षक याप्रमाणे वृक्षारोपण करणे.
22 ते 23 रोजी पाठ्यपुस्तक वितरित करणे.
24 रोजी स्वच्छता गृहाची पाहणी ,निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रयत्न करणे.
29 ते 30 saral udise update करणे.

शाळा व्यवस्थापन समितीची बैठक दि.18/06/2020 रोजी आयोजित करावयाची असून सदरील बेठकीमध्ये शाळा सुरु करण्यापूर्वी करावयाची तयारी, शाळेची व स्वच्छतागृहांची स्वच्छता, शाळा सुरु
केल्यानंतर घ्यावयाची दक्षता, विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून करावयाचे नियोजन इत्यादी बाबत निर्णय घ्यायाचा असून ही बैठक स्थानिक परिस्थितीप्रमाणे प्रत्यक्ष सुरक्षित, शारिरीक अंतर ठेऊन शाळेत किंवा व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे / व्हाँट्स अॅपद्वारे घेण्यात यावी.
ज्या शाळेत क्वारंटाइंन केंद्र किंवा निवारा केंद्र असल्यास ग्रामपंचायत / नगरपालिका यांच्यामार्फत शाळेचे निर्जुतंकीकरण करुन घ्यावे.तसेच सदर शाळाही शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे. नेहमीची लेक्चर पद्धती टाळून मुलांनी स्वतः स्वयं अध्ययन करावे व त्यानंतर त्यांच्या शंका व
प्रश्नांचे निराकरण शिक्षकांनी करावे. डिजीटल माध्यमांचा वापर करुन शासनाच्या ईलनिंग शेक्षणिक सुविधेबाबतची माहिती दि 28/04/2020 शासन परिपत्रकान्वये देण्यात आली आहे. त्या परिपत्रकातील सूचनांचे
पालकांनी जास्तीत-जास्त पालन करण्याबाबत त्यांना प्रोत्साहीत करावे.

* ग्रामपंचायतची जबाबदारी :-

1. ग्रामपंचायतीने शाळेतील फर्निचर बाजूला करुन फर्शीची साबणाच्या पाण्याने साफ-सफाई करुन घ्यावी. तसंच शाळेचे निजुंतंकीकरण, वीज व पाणी पुरविण्याची व इतर अनुषंगिक बाबींची जबाबदारी घ्यावी.
2. बाहेर गावांतृन येणा-या शिक्षकांची शाळेत येण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी अथवा त्यांनी करुन घेतलेल्या वैद्यकीय तपासणीची खातरजमा वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे करावी.
3. विद्यार्थ्यांकरीता शाळांमध्ये साबण, पाणी, मास्क, सॅनिटायझर्स या सुविधा 15 व्या वित्त आयोगातील प्राप्त निधीतून पुरविण्याबाबत निर्णय घ्यावा.मनरेगा अंतर्गत निधी शाळेच्या स्वच्छता करीता वापरण्यात यावा.
4. मुलांचे थर्मलस्क्रीनिंग / वेद्यकीय तपासणी करुन घेण्यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधावा.

आरोग्य विभागाची जबाबदारी :-

1. आरोग्य विभागाने आवश्यकतेप्रमाणे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग / वैद्यकीय तपासणी करुन घेण्यासाठीचे नियोजन करावे.
2. किमान पाच ते कमाल दहा शाळांकरीता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे.
शाळा सुरु करणयापूर्वी एक महिना गावांमध्ये कोणाताही कोव्हीड -19 चा रुग्ण आढळला नाही याची खात्री करुन शासन परिपत्रकात देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शाळा सुरु करण्यात यावी. शासन परिपत्रकात सृचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

Share this story