ताज्या घडामोडीशैक्षणिक

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी दूरदर्शन सह्याद्री,आकाशवाणी व ई संवाद माध्यमांद्वारे शिक्षण-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड*

शेअर करा

 

औरंगाबाद दि 16 ,प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा सुरू करणे शक्य नाही त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणुन ई संवादाच्या माध्यमांचा प्रभावी वापर करून शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुगल क्लास, जिओ टिव्ही यासारख्या इंटरनेट माध्यमांद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. ज्या भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटी नाही अशा भागात दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, आकाशवाणी सारख्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे असे शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

*भंडारदरा भरले;विसर्ग सुरू*

ज्या विद्यार्थ्यांकडे शिक्षणाचे यापैकी कोणतेही साधन उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी मित्र व शिक्षक मित्र यांच्या माध्यमातून विशेष उपक्रम घेऊन शिक्षण देण्यात येत आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा अशा सूचना देण्यात आल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

ज्या ठिकाणी अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही अशा ठिकाणी शिक्षकांनी स्वतःहून जाऊन सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी पुढाकार घेऊन गावातील मुलांना शिक्षण देत आहेत अशा प्रकारचे उपक्रम करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याचे त्यांनी कौतुक केले.

शाळा अनुदान संदर्भात अधिवेशनात विषय निर्णय झाला होता मात्र कोरोनामुळे हा विषय प्रलंबित पडला. याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच टप्पा अनुदानाबाबत निर्णय घेतला जाईल तसेच शिक्षकांचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर शासन सकारात्मक आहे असे त्यांनी सांगितले. ज्या शाळा पालकांकडून ऑनलाईन शिक्षणासाठी सक्तीने शुल्क वसुली करत आहे अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाई करण्यात येईल त्यामुळे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मुलांना किंवा पालकांना शुल्क भरण्याबाबत सक्ती करू नये असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: