ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात आणखी आठ कोरोना बाधित*

संख्या वाढतेय

शेअर करा

 

बीड दि 20 मे टीम सीएमन्यूज

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची भर पडत आहे.नव्याने बीड जिल्ह्यात आठ कोरोना बाधित आढळून आले आहेत .यामध्ये बीड शहरातील मोमीनपुरा आणि सावतामाळी चौक या भागातील पाच जणांचा समावेश आहे.तर दोन जण केज तालुक्यातील आणि एक जण इटकुर येथील आहे .

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरात कोरोना बाधित आढळून येत आहे .हे सर्व मुंबई ठाणे येथून आलेले आहेत .बीड शहरातील मोमीनपुरा ,आणि सावतामाळी चौक या भागात ठाणे येथून आलेले पाच जण पॉझिटिव्ह आढळेल आहेत .गेवराई तालुक्यातील इटकूर येथील कोरोनाग्रस्त मुलीची आई – वय 35, केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील मुंबईहून आलेल्या 23 वर्षाच्या व्यक्ती बाधित आढळून आला .याच तालुक्यातील काळेगाव येथील मुंबईहून आलेल्या व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे आढळून आले आहे .

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: