fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर 1 डिसेंबरला मतदान*

शेअर करा

 

 

मुंबई दि 2 नोव्हेंबर,प्रतिनिधी
विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे

Advertisement
. 12 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. ही निवडणूक पाच जागांसाठी होत आहे.

2020 मध्ये मुदत संपलेल्या पाच विधान परिषदेच्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये तीन पदवीधर मतदार संघ आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

राज्यातील पाच विधानपरिषद मतदार संघाची मुदत काही महिन्यापूर्वी संपली त्यानंतर निवडणूक आयोगाने एक डिसेंबर रोजी या पाच मतदारसंघाची निवडणूक घेण्याचे ठरवले असून त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे .

राज्यातील या पाच विधानपरिषद मतदारसंघांमध्ये तीन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे त्यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदार संघ पुणे पदवीधर मतदार संघ नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ तर अमरावती शिक्षक मतदारसंघ पुणे शिक्षक मतदारसंघ यांचा समावेश आहे.

या पाच मतदारसंघांमध्ये अनुक्रमे सतीश चव्हाण ,अनिल मधुकर सोले, श्रीमंत देशपांडे, दत्तात्रय अच्युतराव सावंत या आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे .

हेही वाचा :पाटोदा शून्यावर;बीड कोरोना बाधितांची संख्या घटली

असा असणार निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्याची अंतिम तारीख
12 नोव्हेंबर 2020
13 नोव्हेंबर छाननी
17 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
1 डिसेंबर मतदान सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत
3 डिसेंबर मतमोजणी

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close