ताज्या घडामोडीदेशविदेश

*पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगांव ता. बार्शी येथील CRPF जवान सुनिल काळे शहीद*

शेअर करा

 

बार्शी दि 23 जून टीम सीएमन्यूज

आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगांव (ता. बार्शी) येथील CRPF जवान सुनिल काळे शहीद झाले आहेत.
पुलवामाच्या बंडजू भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, त्यात भारतीय एक जवान शहीद झाला आहे.
काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत आतापर्यंत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. आधीच्या वृत्तानुसार पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बंडजू येथे शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी संशयास्पद जागेभोवती जेरबंद केल्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
पुलवामा येथील या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. सुरक्षा दलाने हा परिसर घेरला असून शोधमोहीम सुरूच आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. पुलवामाच्या बंडजू भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close