क्राईम

*पत्नीच्या संशयावरून तीन दिवसाच्या अर्भकाची हत्या*

शेअर करा

 

नेवासे दि 10 जुलै टीमसीएम न्यूज

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने तीन दिवसाच्या अर्भकाची हत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील मक्तापुर येथे घडली .पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गाढव नाला मक्तापुर नेवासे येथे ही घटना काल सकाळी घडली .आरोपी अजय मिरीलाल काळे हा आपल्या पत्नीवर संशय घेत असे त्यातून त्याने आपल्या तीन दिवसाच्या अर्भकाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याची फिर्याद पत्नी प्रिया अजय काळे हिने पोलिसांना दिली आहे. यावरून नेवासे पोलिसांत 302चा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जावळे यांनी भेट दिली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close