ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

भय इथले संपेना,माणसे होतायत बिबट्यांची शिकार…!

शेअर करा

 

 

भय इथले संपेना,माणसे होतायत बिबट्यांची शिकार…!

स्थळ: किन्ही गाव…..

वेळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास…….

 

दुपारी नेहमी प्रमाणे कृष्णा हंगे घरापासून साधारणतः एक किमी अंतरावर असलेल्या शेतातील पाणी देण्याची मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर जात असताना त्यांचा भाचा स्वराज उर्फ यश भापकर वय ९ वर्षे मागेमागे चालत होता.चोहोबाजूने तुरीचे पिक माजलेले, तर ज्वारी,कापूसही उंच वाढलेला. या शेतात  दबा धरून बसलेल्या नरभक्षक स्वराज च्या मागून हल्ला केला. क्षणार्धात बिबट्याने यशच्या नरडीचा घोट घेतला.कृष्णा याने मागे वळून पहिले आणि त्यांची बोबडीच वळली. बिबट्याने यशला घेऊन धूम ठोकली होती.

 

आरडओरड झाली, आजूबाजूला माणसे जमली,सर्व जण बिबट्याला मिळेल त्या वस्तूने मारण्याचा प्रयत्न करत होती.याच वेळी भास्कर काकडे हे गवत घेऊन येत होते.त्यांनी सर्व आंखोदेखा सीएम न्यूजशी बोलताना मांडला.लोकांनी वन विभागाला फोन केला आणि काही वेळात किन्ही पासून जवळ असलेले वन विभागाचे कर्मचारी आले आणि शोध मोहीम सुरु झाली.

जवळच असलेल्या तुरीच्या शेतात या बिबट्याने यश चा फडशा पाडत होता. “आम्ही बिबट्याला शोधत शोधत तुरीत गेलो तर बिबट्या त्याचे काम करत होता मी जोरात काठी त्याला मारण्याचा प्रयत्न केला तो जोरात धावून आला आणि त्याने मृतदेह सोडून पळाला”.वनविभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांनी सीएम न्यूजशी बोलताना सांगितले.

आष्टी तालुक्यातील किन्ही या गावात शेतवस्तीवर आजीकडे सुट्टीनिमित्त आलेल्या स्वराज्य सुनिल भापकर (१०, रा.भापकरवाडी ता.श्रीगोंदा जि.नगर) या  दहा वर्षीय मुलाची दुपारी बिबट्याने शिकार केली. आष्टी तालूक्यातील ही सलग तिसऱ्या दिवशीची घटना आहे.

यापूर्वी आष्टी तालुक्यातील सुरडी येथील पंचायत समिती सदस्य पती नागनाथ गर्जे यांची अशीच त्यांच्या शेतात  बिबट्याने शिकार केल्याची घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडल्याने  किन्ही गावासह परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. वनविभागाने तातडीने या नरभक्षक बिबट्यांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करावे अन्यथा शासनाकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्वराज्य सुनिल भापकर (१०, रा.भापकरवाडी ता.श्रीगोंदा जि.नगर) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. स्वराज्य हा किन्ही येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्याच्या आजी मिरणबाई लालाभाऊ काकडे हिच्याकडे आला होता.किन्ही गावापासून अर्धा कि.मी.अंतरावर खंडोबा मळा आहे. या ठिकाणी शुक्रवारी सकाळी स्वराज्यसह त्याचे काका कृष्णा हिंगे (मावशीचा नवरा)  आजी,मावशी शेतात गेले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, कुटुंबिय गहू खुरपत होते तर काका जवळच विहिरीवर लाइट आली की नाही हे पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी काकसोबत स्वराज्य देखील जात असताना तो मधेच बोरीच्या झाडाखाली बोरं वेचत असताना अचानक शेजारील तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वराज्यवर झडप घालत त्याला भक्ष्य केले. यावेळी  त्याचे काका शेजारीच असलेल्या विहिरीवरचा विद्युत पंप सुरू करत होते.  त्याच्या आवाजाने काका त्या दिशेने धावून गेले. पाहताक्षणी समोर त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बिबट्याने शेपुट मारत स्वराज्यला तोंडात पकडून काही अंतरावरील एका झुडपात नेले. नंतर स्वराज्यच्या काकासह परिसरातील शेतकर्‍यांनी व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी  बिबटयाचा शोध सुरू केला. त्यावेळी बिबट्या झुडपात बसून स्वराज्यचे लचके तोडत होता.त्यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास काठ्या मारून हुसकून लावले त्यावेळी बिबट्याने तेथून पळ काढला. याच परिसरात स्वराज्यचा मृतदेह आढळून आला.

गावकऱ्यांसह वन विभागाच्या नागरिकांनी बिबट्याला हुसकावून लावले.त्यांतर स्वराजचा मृतदेह आष्टी येथे पोस्टमार्टेम साठी पाठविण्यात आला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांचा आक्रोश येथे जागोजागी दिसत होता.वन विभागाचा ताफा आल्यानंतर बीडचे वनाधिकारी मधुकर तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली  वन परिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांच्यासह कर्मचारी या बिबट्याच्या शोधात लागले.याबाबत माहिती देताना तेलंग यांनी सांगितले कि, ही दुर्दैवी घटना घडली आहे. आठवड्यातील हा दुसरा बळी असल्याने आम्ही सतर्क झालो असून आम्ही येथे ट्रप कॅमेरे आणि पिंजरा लावला आहे. या परिसरात हा बिबट्या नरभक्षक असावा.यापूर्वी सुरुडी येथे हल्ला केलेला हा असावा. त्या स्थळाचे आणि हे अंतर जवळ असून तो तीन दिवसात या भागात येऊ शकतो. त्याला पकडण्यासाठी आम्ही औरंगाबाद, अमरावती येथील पथकांना पाचारण करण्यात आले आहे. लवकरच हा पिंजरयात येईल. आम्ही नागरिकाना आवाहन करतो कि, तुम्ही काळजी घ्यावी,शेतात जाताना एकट्याने न जाता समूहाने जावे”.

हेही वाचा :हत्या करून बिबट्या मोकाट;हे गाव अजूनही बिबट्याच्या दहशतीखाली

 

नागनाथ गर्जे,स्वराज आणि आणखी किती….? जोपर्यंत हा बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत भय इथले संपणार नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close