कृषीवार्ताताज्या घडामोडी

खत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार

शेअर करा

बीड/प्रतिनिधी
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड वाढ केल्याने राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. खत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी, माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी केंद्र सरकारचा पुतळा जाळून प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार आहे बीड जिल्ह्यात देखील सदर आंदोलन कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर नियम व अटी पाळून अभिनव पद्धतीने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी माध्यमांना दिली आहे.
आधीच कोरोना संकटात एक वर्षांपासून होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असताना केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, कोरोना महामारी मुळे शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.शेतीमाल खरेदी बंद असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा भाजीपाला, ज्वारी, गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, तूर, फळे, फुले, आदी प्रकारचे शेतीमाल घरात पडून आहेत बऱ्याच मालाचे सडून मोठे नुकसान झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत असल्याने लॉक डाऊन मध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामात पेरणीसाठी खते, बी-बियाणे-औषधे मुबलक व योग्य परवडतील अशा दरात उपलब्ध करणे सरकारची जबाबदारी आहे .मात्र सतत शेतकरी विरोधी धोरणे राबवून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच वेठीस धरले आहे. खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारविरोधात जोरदार व प्रचंड आक्रमक पणे आवाज उठवला असून दि.20 मे 2021 वार गुरुवारी सकाळी 11 वाजता अभिनव पद्धतीने प्रचंड आक्रमक व लक्षवेधी राज्यव्यापी आंदोलन माजी खा. राजू शेट्टी,माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली होत असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खत दरवाढीविरोधात या आंदोलनात आपल्या बांधावर, शेतात ,गावात ,जमेल त्या ठिकाणी केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close