ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्यात आज पाच नव्या रुग्णांची भर;७३ कोरोनामुक्त*

*आज आणखी ०३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*

शेअर करा

 

अहमदनगर दि 1 जून टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज पाच’ने भर पडली .त्यामुळे एकूण संख्या १५२ झाली आहे. दुसरीकडे आज तीन बाधित कोरोना मुक्त झाले त्यांना आज घरी सोडण्यात आले .घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या ७३ इतकी झाली आहे .

आज नव्याने बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये
अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील पंचवीस वर्षे युवक,शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील तीस वर्षीय युवक यांचा समावेश आहे हा युवक कल्याण येथून येऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे .हा युवक कल्याण येथे फायर ब्रिगेड मध्ये कर्मचारी असून त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे .त्याला खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने झाला होता ऍडमिट करण्यात आले होते. घुलेवाडी संगमनेर येथील 35 वर्षीय युवक बाधित झाला असून तो कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता.
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील 32 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असून हा घाटकोपर येथुन गावाकडे आला होता.

बरे झालेल्या बधितांमध्ये तिघांचा समावेश आहे
या तिघांना घरी सोडण्यात आले .श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ५६ वर्षीय व्यक्ती कोरोनातून बरे झाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close