ताज्या घडामोडीमराठवाडा आणि विदर्भमहाराष्ट्र

*राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सह पाच जणांना कोरोनाची लागण*

शेअर करा

 

बीड दि ,12 जून टीम सीएमन्यूज

राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे .मुंडे यांच्या स्वीय सहायकासदेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. परळीत जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह औरंगाबाद येथे 5 जुन रोजी आढळुन आली होती. त्यावेळी तिच्या कुंटूबीयांच्या संपर्कात ना.धनंजय मुंडे देखील आले होते. मात्र मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिक्स गटात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आढळुन आले होते.
त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणु निदान प्रयोग शाळेचे उद्घाटन देखील केले होते. आता मुंडे यांना करोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु या प्रयोग शाळेच्या उद्घाटनाला अनेकजण उपस्थित होते.यामध्ये जिल्हाधिकारी, आमदार संजय दौंड यांच्यासह डीन उपस्थित होते.
बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंत्री मुंडे यांच्या आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी 28 दिवस क्वारंटीन व्हावे. क्वारेन्टीनची काटेकोरपणे काळजी घ्यावी आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय आरोग्य सुविधांना कळवावे असे आवाहन केले आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close