CSK vs DC,IPL 2021,रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्जवर ३ गडी राखून मात.
CSK vs DC,IPL 2021,

अबू धाबी (गौरव डेंगळे,५/१०)

CSK vs DC,IPL 2021,गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरी व शिमरॉन हेटमायरच्या शेवटच्या षटकात मध्ये केलेली फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ गडी राखून पराभव करत आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

     १३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला DC विजयासाठी शेवटच्या ३ षटकांत २८ धावांची गरज होती.

हेटमायरने ड्वेन ब्राव्होच्या षटकात १२ धावा व नंतर जोश हेझलवूडच्या षटकात १० धावा काढल्या.

आता दिल्लीला शेवटच्या षटकात फक्त ६ धावांची गरज होती,दिल्लीने अक्षर पटेलची विकेट गमावून व २ चेंडू बाकी

असताना विजयी लक्ष्य पुर्ण केले. हेटमायर १८ चेंडूत २८ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, दिल्लीच्या गोलंदाजांनी

चेन्नईला CSK ५ गडी बाद १३६ धावांवर रोखले. अंबाती रायुडूने चेन्नईसाठी ४३ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या,

पण बाकीचे फलंदाज धावा करू शकले नाहीत.दिल्लीने अतिशय आक्रमक सुरुवात केली.पृथ्वी शॉने ७ चेंडूत ३ चौकार लगावले.

मात्र दीपक चाहरच्या उसळत्या चेंडूवर त्याला मिड ऑफमध्ये फाफ डु प्लेसिसने झेलबाद केले.

हेझलवूडने चौथ्या षटकात फक्त ३ धावा दिल्या, पण शिखर धवनने (३५ चेंडूत ३९) ५व्या षटकात २ षटकार

व २ चौकारांसह चहरला २१ धावा काढल्या. हेझलवूडने श्रेयस अय्यरला २ धावावर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

त्याचबरोबर रवींद्र जडेजाने ऋषभ पंतला (१५) बाद केले.आपला पहिला सामना खेळणाऱ्या रिपल पटेलने २ चौकार मारले,

पण जडेजाने त्याला बाद केले.आर अश्विनही टिकू शकला नाही तर शिखर धवनला ठाकूरने बाद केले.

दिल्लीची धावसंख्या २५ षटकांनंतर ६ बाद ९९ होती.त्यानंतर हेटमायरने संघाला अडचणीतून बाहेर काढले.

कृष्णाप्पा गौतमने हेटमायरला जीवदान मिळाले.तत्पूर्वी, चेन्नईच्या  CSK डावाच्या १९व्या षटकात रायडूने

एनरिक नॉर्टजेला  चौकार व षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले.या षटकात चेन्नईने १४ धावा केल्या.

वेगवान गोलंदाज अवेश खानने मात्र शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी केली व फक्त ४ धावा दिल्या.

त्याने पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीला (१८) बाद केले. रायडूने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले.

दिल्लीच्या गोलंदाजांनी खराब सुरुवात केली जेव्हा नॉर्टजेने पहिल्या षटकात १६ धावा दिल्या, त्यापैकी ९ लेगबाईज होत्या.

पंत यष्टीमागे डायविंग करूनही चेंडू रोखू शकला नाही. चेन्नईला आतापर्यंत चांगली सुरुवात करून देणारे

सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डु प्लेसिस आज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.डु प्लेसिसने

अवेशला २ चौकार मारले.चेन्नईने पहिल्या २ षटकांत २६ धावा केल्या होत्या.यानंतर फिरकीपटू अक्षर पटेलने

ड्यू प्लेसिसला मिडविकेटवर श्रेयस अय्यरकडे झेलबाद केले. दुसरीकडे, गायकवाडने ५ व्या षटकात

पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकवला व नॉर्टजेच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनकडे झेल दिला.

पॉवरप्लेच्या ६ व्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या होती २ बाद २८. चेन्नईने १० षटकांत ४ बाद ६९ धावा केल्या.अक्षरनी मोईन अली तर अश्विनने सुरेश रैनाच्या जागी खेळणार रॉबिन उथप्पाला बाद केले.


CSK vs DC,IPL 2021,संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग CSK: २० षटकात ५/१३६ ( अंबात्ती रायडू ५५*, रॉबीन उथप्पा १९,पटेल २/१८)
दिल्ली कॅपिटल DC: १९.४ षटकात ७/१३९ ( शिखर धवन ३९, शिमरोन हेटीमर २८*, ठाकूर २/१३)

 

Share this story