CSK vs KKR, IPL 2021,चेन्नईचा कोलकत्तावर २ गडी राखून विजय.
CSK vs KKR, IPL 2021

दुबई (गौरव डेंगळे,२६/९)

CSK vs KKR, IPL 2021,रवींद्र जडेजा च्या ८ चेंडूत २२ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स CSK ने

शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स KKR चा २ गडी

राखून पराभव केला.

१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसकेच्या सलामीच्या फलंदाजांनी अतिशय

आक्रमक सुरुवात केली परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या बेजबाबदार फलंदाजीमुळे 

संघाचा डाव गडगडला.शेवटच्या काही षटकांमध्ये जडेजाने ८ चेंडूत २२ धावांची खेळी करत

विजय खेचून आणला.

चेन्नई CSK कडून फाफ डु प्लेसिस (४४), ऋतुराज गायकवाड (४०) आणि मोईन अली (३२)

यांनी धावांचे योगदान दिले.तत्पूर्वी, फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर केकेआरने २० षटकात

६ बाद १७१ धावा केल्या.राहुल त्रिपाठीने ३३ चेंडूंत ४५ धावा केल्या,तर नितीश राणा (नाबाद ३७)

आणि दिनेश कार्तिक (२६) यांनीही उपयुक्त योगदान दिले.

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सीएसके CSK साठी सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता,

त्याने ४ षटकांत २० धावा देत २ गडी बाद केले.जोश हेझलवूडने केकेआर KKR चा कर्णधार इऑन मॉर्गनसह २ गडी बाद केले.

CSK vs KKR, IPL 2021

संक्षिप्त धावसंख्या: कोलकाता नाईट रायडर्स KKR : २० षटकांत १७१/६ (राहुल त्रिपाठी ४५, नितीश राणा नाबाद ३७, दिनेश कार्तिक २६; शार्दुल ठाकूर २/२०). चेन्नई सुपर किंग्ज: २० षटकांत ८ बाद १७२ (फाफ डु प्लेसिस ४४, रुतुराज गायकवाड ४०, रवींद्र जडेजा २२; सुनील नारायण ३/४१

Share this story