CSK Vs MI मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर चेन्नईचा मुंबईवर २० धावांनी विजय
CSK Vs MI

दुबई (१९/९)
गौरव डेंगळे

CSK चेन्नई सुपर किंग्ज (१५६/६) ने इंडियन प्रीमियर लीगच्या  पहिल्याच सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स  MI   (१३६/८) चा २० धावांनी पराभव केला.आणि पुन्हा एकदा  टॉपर्स बनले. 

मुंबई इंडियन्स (MI) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSK): किरोन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांना ९४/६ वर झटपट बाद झाल्यावर एमआयने सामना गमावला. 
त्याआधी, दीपक चाहरने क्विंटन डी कॉकला १७ धावांवर एलबीडब्ल्यू आउट करून सीएसकेला पहिले यश मिळवून दिले.

IPL 2020 schedule: विश्वचषक धमाका आजपासून सुरु!


 त्यानंतर अनमोलप्रीत सिंगला त्याने त्रिफळाचीत केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच षटकात सूर्यकुमार यादवची मोठी विकेट मिळवली. तत्पूर्वी  गायकवाडने आपले सहावे आयपीएल अर्धशतक फटकावले आणि ५८ चेंडूत ८८ धावांवर जोरावर सीएसकेने १५६/६ धावा केल्या.
 जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

बुमराहने जडेजाच्या विकेटसह भागीदारी तोडण्यापूर्वी गायकवाडने रवींद्र जडेजासह ८१ धावाची भागीदारी केली. एमआयने डावाच्या पहिल्याच षटकात फटकेबाजी करत बोल्टने फाफ डु प्लेसिसला शून्यावर बाद केले. त्यानंतर, मिल्ने आणि बोल्टने मोईन अली आणि सुरेश रैनाला पुढच्या दोन षटकांत बाद करून चेन्नईला ७/३ असे संकटात टाकले.

नंतर पॉवरप्लेमध्ये मिलने एमएस धोनीची विकेट मिळवून चेन्नईला अडचणीत आणले. अंबाती रायुडूला कोपर मारल्याने दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.
नाबाद ८८ धावांची खेळी करणारा ऋतुराज गायकवाड सामनावीर म्हणून घोषित करण्यात आला.

 

Share this story