CSK vs PBKS,IPL 2021:के एल राहुलची दुबईत वादळी खेळी,पंजाबचा मोठा विजय
CSK vs PBKS,IPL 2021,

गौरव डेंगळे/दुबई,७ ऑक्टो,


CSK vs PBKS,IPL 2021:पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्जवर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२१ च्या ५३व्या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला.

फाफ डु प्लेसिसने ५५ चेंडूत ७६ खेळी केल्याने चेन्नई सुपर किंग्सने CKS  २० षटकांत ६/१३४ पर्यंत मजल मारली.

पंजाब किंग्स PBKS कडून अर्शदीप सिंग (२/३५) व ख्रिस जॉर्डन (२/२०) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.
विजयासाठी १३५ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार के एल राहुल आक्रमक नाबाद ९८ धावा खेळीच्या जोरावर १३ व्या षटकात विजयी लक्ष्य पूर्ण केले.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचा प्लेऑफपूर्वी हा तिसरा पराभव होता. या सामन्यात शार्दुल ठाकूर (३/२८) चेन्नईसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

RR vs MI,IPL 2021,राजसथानचा पराभव करत मुंबई इंडियन्सने प्ले ऑफ मध्ये खेळण्याचा अशा ठेवल्या जिवंत.

CSK vs PBKS,IPL 2021,पंजाबचा कर्णधार के एल राहुलची वादळी खेळी

१३५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब संघाचा कर्णधार व सलामीवीर के एल राहुल यांनी या सामन्यात वादळी खेळी केली.

८ षटकार व ७ चौकारांच्या मदतीने राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी केली. ४२ चेंडूचा सामना करत राहुलने ९८ धावा केल्यात.

राहुल ने  IPL 2021 आयपीएल स्पर्धेत १३ सामन्यात एकूण ६२६ धावा ठोकल्या आहेत.

CSK vs PBKS,IPL 2021,संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्स CSK: २० षटकात ६/१३४ (फाफ डु प्लेसिस ७६, रवींद्र जडेजा १५ ख्रिस जॉर्डन २/२०) 
पंजाब किंग्स PBKS : २० षटकात ४/१३९ ( के एल राहुल ९८,शार्दुल ठाकूर ३/२८)

 

Share this story