DC vs KKR IPL 2021 कोलकत्ता नाइट रायडर्स चा दिल्ली कॅपिटलवर विजय
DC vs KKR IPL 2021 

DC vs KKR IPL 2021 कोलकत्ता नाइट रायडर्स चा दिल्ली कॅपिटलवर विजय

दुबई ( गौरव डेंगळे,२८/९)

DC vs KKR ,IPL 2021 :कोलकाता नाईट रायडर्सने १२८ धावांचा लक्ष्य १९ षटकात पार करत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३ राखुन विजय नोंदवला.

या विजयने केकआर संघाने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

DC vs KKR विजयासाठी १२८ धावांचा पाठलाग करताना केकेआरने सलामीवीर व्यंकटेश अय्यर (१४) आणि फलंदाज राहुल त्रिपाठी(९) यांना अनुक्रमे ललित यादव आणि आवेश खान झटपट बाद केले.कागिसो रबाडा आणि आर अश्विनने त्यानंतर आणखी दोन झटके देत शुभमन गिल (३०) आणि कर्णधार इऑन मॉर्गन (०) बाद केले .

आवेश खान ने दिनेश कार्तिकला (१२) वर बाद केले. नितीश राणा(नाबाद ३२) व सुनील नरेन (२१) यांच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे KKR केकेआर ने हा सामना ३ गडी व १० चेंडू शिल्लक ठेवून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १२७/९ पर्यंत मर्यादित मजल मारली.

कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर DC दिल्लीने २ गडी झटपट गमावले.लॉकी फर्ग्युसनने धोकादायक शिखर धवन (२४) वर बाद केले, तर नरेनने श्रेयस अय्यर(१) वर बाद केले .त्यानंतर फर्ग्युसनने सामन्यातील दुसरा गडी बाद केला.

स्टीव्ह स्मिथ त्याने ३९ धावांवर बाद केले. हेटम्येरला  ४ धावांवर बाद करत वेंकटेश अय्यरने आयपीएलची पहिली विकेट घेतली.

पटेल बाद करत वेंकटेशने सामन्यातील दुसरा गडी बाद केला. कर्णधार ऋषभ पंत च्या ३९ धावांच्या खेळीने दिल्ली कॅपिटल्स संघ DC vs KKR निर्धारित २० षटकात १२७ धावांची मजल मारू शकला.

DC vs KKR: संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल: २० षटकात ९/१२७ ( ऋषभ पंत ३९, स्टीव्ह स्मिथ ३९ , सुनील नारायण २/१८)

केकेआर : २० षटकात ७/१३० (नितेश राणा नाबाद ३६, शुभम गिल ३०, आवेश खान ३/१३)

Share this story