IPL 2021, DC vs SRH,दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला; गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा मिळवले
DC vs SRH

दुबई!  (गौरव डेंगळे)
IPL 2021, DC vs SRH
आयपीएल २०२१  ३३व्या सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे दिल्ली कॅपिटल्सच्या अष्टपैलू कामगिरीने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला.

शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि कर्णधार ऋषाभ पंत यांच्या फलंदाजीने सामन्यांत वर्चस्व गाजवले.


DC vs SRH या विजयासह,डीसीने गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकाविला आहे.जिंकण्यासाठी १३५ धावांची आवश्यकता होती, तिसऱ्या षटकात सनराइजर्सला पाहिले यश मिळाले,सलामी फलंदाज शॉला खलील अहमदने बाद केले.शॉ बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर आला.

त्याने व  धवनने पॉवरप्ले मध्ये डीसी संघाला ३९/१ नेले. दोघांमध्ये ५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.तथापि, रशीद खानने धवनला ४२ धावांवर बाद केले.DC vs SRH

धवन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी कर्णधार पंत आला.पंत आणि अय्यरने आक्रमक फलंदाजी करत ६७ धावांची अभेद्य भागीदारी केली व दिल्ली हा सामना २.१ षटके बाकी ठेवून आरामात जिंकला.

अय्यरने ४७ धावा करून तर कर्णधार पंतने २१ चेंडूत जलद नाबाद ३५ धावा फटकावल्या.

त्याआधी,फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर,एसआरएचने डेव्हिड वॉर्नरला पहिल्या षटकात गमावले. त्यानंतर रिद्धिमान साहा आणि विल्यमसन यांनी मिळून २९ धावा जोडल्या,रबाडाने साहा बाद करत एसआरएचला दुसरा झटका दिला.

साहाने १८ धावा केल्या.पंत आणि शॉ कडून जीवदान मिळेला विलियम्सनने धावफलक हलता ठेवत एसआरएच ५० पार नेले.१८ धावा असताना विलियम्सला पटेलने बाद केले.रबडाने मनीष पांडेला १७ धावावर बाद करत सामन्यातील दुसरी विकेट घेतली. फलंदाजीस उतरलेल्या केदार जाधव ३धावा करुन बाद झाला .

डीसीला ११० धावांच्या पुढे नेण्यासाठी समदच्या २८ धावा तर रशीद खानच्या २२धावा मुळे सनरायझर्स २० षटकात ९ गडी बाद १३४ धावा करून शकला.

संक्षिप्त गुण:
 दिल्ली कॅपिटल्स १३९/२ (श्रेयस अय्यर ४७*, शिखर धवन ४२; रशीद खान १/२६) सनरायझर्स हैदराबाद १३४/९ (अब्दुल समद २८, रशीद खान २२;कागिसो रबाडा ३/३७) सनरायझर्स आठ गडी राखून पराभूत.

Share this story