IPL 2021 PBKS vs RR:कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबची फलंदाजी फेल
IPL 2021 PBKS vs RR

गौरव डेंगळे
दुबई 
 IPL 2021 PBKS vs RR इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३२ वा सामन्यात राजस्थान रॉयल्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर २ धावांनी विजय.

 
राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या.

तसेच महिपाल लोमरोरने ४३ आणि एविन लुईने ३६ धावांची आक्रमक खेळीचा जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकात सर्व गडी बाद १८५ धावा केल्या तर,पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ गडी बाद केले.

याशिवाय मोहम्मद शमीने ३ गडी, तर इशान पोरेल आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी १ गडी बाद केला.

या सामन्यात पंबाज किंग्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे राजस्थान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. राजस्थानकडून एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीला फलंदाजी केली.

या दोघांनीही संघाला दमदार सुरुवात करुन दिली. लुईसने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळायला सुरुवात केली होती.

तर, दुसऱ्या बाजूने जयस्वाल त्याला साथ देत होता. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही रचली.
पण अखेर ६ व्या षटकात लुईसला अर्शदीप सिंगने मयंर अगरवालकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यामुळे त्याची आणि जयस्वालची ५४ धावांची भागीदारी तुटली.लुईसने २१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ३६ धावा केल्या. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार संजू सॅमसन फारसा प्रभाव पाडू शकला नाही.

त्याला पदार्पणवीर इशान पोरेलने ४ धावांवर ८ व्या षटकात बाद केले.
यानंतर जयस्वालला लियाम लिव्हिंगटनने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, तो तुफानी खेळ करण्याच्या नादात १७ चेंडूत २५ धावा करुन १२ व्या षटकात बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने जयस्वालसह ४८ धावांची भागीदारी केली.

त्याला अर्शदीप सिंगने बाद केले.
त्यानंतरही जयस्वाल चांगल्या लयीत खेळत होता. त्यामुळे तो त्याचे पहिले आयपीएल अर्धशतक करेल असे वाटत होते.

मात्र, तो अर्धशतकापासून केवळ १ धाव दूर असताना हरप्रीत ब्रारने त्याला मयंक अगरवालकरवी झेलबाद केले. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारासंह ४९ धावा केल्या.
यानंतर राजस्थानने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

मात्र, असे असताना महिपाल लोमरोरने तुफानी खेळी करत राजस्थानच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.

त्याने १६ व्या षटकात २४ धावा चोपल्या. पण त्यानंतर १७ व्या षटकात रियान परागला ४ धावांवर मोहम्मद शमीने बाद केले.

१८ व्या षटकात लोमरोर देखील अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्याने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार मारत ४३ धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर १९ व्या षटकात राहुल तेवतिया आणि ख्रिस मॉरीस यांना शमीने बाद करत दुहेरी धक्का दिला.
यानंतरही अखेरच्या षटकात कार्तिक त्यागी kartik tyagi आणि चेतन सकारीया यांना बाद करत अर्शदीपने ५ विकेट्स पूर्ण केल्या.

अखेर राजस्थानने २० षटकांअखेर सर्वबाद १८५ धावा केल्या.

१८६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब संघाची सुरुवात धडाकेबाज झाली.

Read More:KKR Vs RCB ,IPL 2021 केकेआरचा आरसीबीवर दणदणीत विजय

सलामी फलंदाज मयंक अग्रवाल याच्या ६७ धावा तर कर्णधार के एल राहुल यांच्या ४९ धावाचा आक्रमक खेळीमुळे विजयासाठी १८६ धावांचे आव्हान खूपच छोटा वाटू लागले.

दोघांनी अकराव्या  षटकामध्ये १२० धावांची भागीदारी केली. के एल राहुल ४९ धावांवर असताना चेतन सहकरिया याने बाद केले. त्यानंतर अग्रवालला ६७ धावांवर असताना तेवतीया ने बाद केले.

IPL 2021 PBKS vs RR:कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबची फलंदाजी फेल

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मरक्राम व पूरम यांनी संघाला विजयाच्या समीप पोहोचवले. अखेरच्या षटकात ६ चेंडू मध्ये ४ धावांची आवश्यकता असताना कार्तिक त्यागी च्या अप्रतिम गोलंदाजीवर पूरम व हूडा बाद झाले. शेवटच्या षटकात किंग्स इलेव्हन पंजाब या संघाला एकच धाव करता आली व हा सामना कार्तिक त्यागीच्या सुरेख गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्स ने २ धावांनी जिंकला.
 

Share this story