IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR:दिल्लीचा पराभव करत कोलकत्ता तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत.
IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR,

गौरव डेंगळे (१४/१०)

IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR,इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ३ गडी राखून पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने KKR  दिल्लीला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

आता त्यांचा सामना १५ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने DC शारजाह येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (Qualifier 2 ) २० षटकांत ५ बाद १३५ धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने एक चेंडू बाकी ठेऊन सामना जिंकला.

कोलकाताला जिंकण्यासाठी शेवटच्या २ चेंडूंत ६ धावांची गरज होती.राहुल त्रिपाठीने षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.


KKR,कोलकाता तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत.


व्यंकटेश अय्यर,राहुल त्रिपाठी व शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचे हिरो ठरले.

या महत्त्वाच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने ४१ चेंडूत ५५ धावा केल्या. वेंकटेश अय्यरने त्याच्या अर्धशतकी खेळीत ३ षटकार व ४ चौकार मारले.त्याचा स्ट्राइक रेट १३४.१५ होता.शारजाच्या खेळपट्टीवर असा स्ट्राईक रेट खरोखर आश्चर्यकारक आहे.

वेंकटेश अय्यरने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी ७४ चेंडूत ९६ धावांची भागीदारी केली.ही भागीदारी दिल्ली कॅपिटल्सवर भारी ठरली.

दुसरीकडे,कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.कोलकाताने दोन्ही वेळा अंतिम फेरीत स्थान मिळवले, तेव्हा त्याने विजेतेपदही पटकावले. कोलकात्याने २०१२ व २०१४ मध्ये आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता.


कोलकात्याने नाणेफेक जिंकली व दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली.


कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला शारजाच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

पृथ्वी शॉ व शिखर धवनने दिल्लीला झटपट सुरुवात केली. शॉने १२ चेंडूत २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने १८ धावा केल्या.पाचव्या षटकात वरुण चक्रवर्तीने पहिल्याच चेंडूवर शॉला बाद करून कोलकाताला यश मिळून दिले.यानंतर मैदानात आलेल्या स्टोइनिसला २३ चेंडूत फक्त १८ धावा करता आल्या.

३९ चेंडूत ३६ धावांची संघर्षपूर्ण खेळी खेळल्यानंतर धवनही वरूण चक्रवर्तीचा बळी ठरला. कर्णधार पंत फक्त ६ धावा करू शकला. मात्र,श्रेयस अय्यरने २७ चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी करत दिल्लीला १३५ धावांवर नेले.


कोलकात्याची सुरेख सुरवात.


शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर यांनी कोलकाताला अप्रतिम सुरुवात दिली.दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावा जोडून दिल्ली कॅपिटल्सला सामन्याबाहेर काढले होते, पण व्यंकटेश अय्यरची विकेट पडताच सामना अचानक बदलला.

कागिसो रबाडाने सामन्यात दिल्लीचे पुनरागमन केले.त्याने प्रथम व्यंकटेश अय्यरला बाद केले. त्यानंतर या वेगवान गोलंदाजाने १८ व्या षटकात फक्त १ धाव देऊन दिनेश कार्तिकची विकेटही घेतली.

आणखी वाचा :IPL 2021,DC vs KKR,चेन्नई सुपर किंग्स सोबत अंतिम सामन्यात कोण लढणार?दिल्ली का कलकत्ता?

१८व्या षटकात नॉर्कियाने इयोन मॉर्गनलाही अवघ्या ३ धावांवर बाद केले.शेवटच्या षटकात केकेआरला ६ चेंडूत ७ धावांची गरज होती.

अश्विनने शेवटचे षटक टाकले.पहिल्या ४ चेंडूंमध्ये त्याने शाकिब अल हसन व सुनील नरेनला अवघ्या १ धावांवर बाद करून सामना रोमांचक बनवला.

शेवटच्या २ चेंडूंवर, केकेआरला ६ धावांची गरज होती.राहुल त्रिपाठीने आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी लाँग ऑफच्या दिशेने षटकार ठोकला.

IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR,संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल  : २० षटकात  ५/१३५ (धवन ३९,अयार ३०*, वरुण २/२६)
कोलकत्ता नाइट रायडर्स : १९.५ षटकात ७/१३६ (वेंकटेश ५५,गिल ४६, रबाडा २/२३)

 

Share this story