IPL 2021,SRH vs CSK :महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार,चेन्नई सुपर किंग्सचा हैदराबाद सनरायझर्सवर ६ गडी राखून विजय.
IPL 2021,SRH vs CSK

IPL 2021,SRH vs CSK :महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार,चेन्नई सुपर किंग्सचा हैदराबाद सनरायझर्सवर ६ गडी राखून विजय.

अबू धाबी ( गौरव डेंगळे,१/१०)


IPL 2021,SRH vs CSK चेन्नई सुपर किंग्सने शारजा येथे खेळलेल्या आयपीएल २०२१ च्या ४४ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी राखून पराभव केला.

प्रथम खेळताना हैदराबादने २० षटकांत ७ गडी बाद १३४ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात चेन्नईने शेवटच्या षटकात ४ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

चेन्नई csk  कडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ४५ धावा केल्या.दुसरीकडे फाफ दुबे प्लेसिसने ४१ धावांची खेळी खेळली.

शेवटच्या षटकात कर्णधार एमएस धोनीने षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या उत्तरार्धात चेन्नईचा हा सलग चौथा विजय आहे.

त्याचबरोबर चेन्नईचा या मोसमात ११ सामन्यांत एकूण ९ वा विजय आहे. यासह,त्याने प्लेऑफसाठी तिकीट मिळवले आहे.srh हैदराबादकडून १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नई सुपर किंग्जला csk शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०.१ षटकांत ७५ धावांची भागीदारी केली.

मात्र, गायकवाड आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही व ४५ धावांवर जेसन होल्डरच्या हाती झेलबाद झाला. त्याने आपल्या डावात ४ चौकार आणि २ षटकार मारले.यानंतर मोईन अली आणि फाफ यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी झाली.

पण अली १७ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने १७ धावा करून बाद झाला. राशिद खानने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर जेसन होल्डरने सुरेश रैनाला (०२) बाद करून सामन्यात रंगत आणली. यानंतर थोड्याच वेळात फाफही ४१ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या डावात ३ चौकार आणि २ षटकार मारले.
यावेळी हैदराबाद संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते, पण अंबाती रायुडू आणि एमएस धोनीने त्यांची योजना बिघडवली. धोनी ११ चेंडूत १४ आणि रायडू १३ चेंडूत १७ धावांवर नाबाद राहिले. दोघांनीही आपल्या डावात १ चौकार व १ षटकार ठोकला. मात्र,मनोरंजक गोष्ट म्हणजे धोनीने आपल्या जुन्या शैलीत षटकार ठोकून संघाला विजयी केले .त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादकडून जेसन होल्डरने २७ धावांत ३गडी बाद केले.याशिवाय रशीद खानला यश मिळाले.


तत्पूर्वी हैदराबादने केल्या होत्या १३४ धावा.नाणेफेक गमावून फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादला चांगली सुरुवात झाली नाही. शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा सलामीवीर जेसन रॉय अवघ्या २ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार केन विल्यमसननेही ११ चेंडूत ११ धावा केल्या.

रॉयला हेझलवूडने तर विल्यमसनला ब्राव्होने बाद केले.४३ धावांवर २ गडी गमाल्यानंतर युवा प्रियम गर्ग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण त्यालाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही,त्याने १० चेंडूत ७ धावा केल्या. ब्राव्होने  हैदराबाद संघाकडून रिद्धीमान साहाने ४६ चेंडूत ४४ धावा केल्या. साहाने आपल्या डावात १ चौकार व २ षटकार ठोकले.

अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादचा डाव पुढे नेला.दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. अभिषेक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात १८ धावांवर बाद झाला. त्याने एकूण १३ चेंडूंचा सामना करत १ चौकार आणि १ षटकार ठोकला.

यानंतर समदही १४ चेंडूत १८ धावा करून बाद झाला. त्याने १ चौकार व १ षटकारही मारला.शेवटी, राशिद खानने १३ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या व संघाची धावसंख्या १३० च्या पुढे नेली. त्याचवेळी जेसन होल्डर ५ धावा काढून बाद झाला. दुसरीकडे, भवनेश्वर कुमार २ धावांवर नाबाद परतला.त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने चेन्नई सुपर किंग्जसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने आपल्या ४ षटकांत २४ धावा देऊन ३ गडी बाद केले. याशिवाय ब्राव्होने ४ षटकांच्या १७ धावा देऊन २ गडी बाद केले . शार्दुल ठाकूर व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

IPL 2021,SRH vs CSK संक्षिप्त धावफलक

हैदराबाद सनरायझर्स SRH : २० षटकात ७/१३४( साहा ४४, शर्मा १८, जोश ३/२४)
चेन्नई सुपर किंग्स CSK : १९.४ ४/१३७ ( गायकवाड ४५, फाफ ४१, होल्डर ३/२७)

 

Share this story