KKR Vs RCB ,IPL 2021 केकेआरचा आरसीबीवर दणदणीत विजय
KKR Vs RCB ,IPL 2021 केकेआरचा आरसीबीवर दणदणीत विजय

अबुधाबी २०/९ (गौरव डेंगळे)

 इंडियन प्रीमीयर लीग IPL 2021  हंगामातील ३१ वा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर KKR Vs RCB ९ गडी राखून दणदणीत पराभव केला.

या सामन्यात बेंगलोरचा संघाचा डाव १९ षटकात ९२ धावांवर संपुष्टात आला.

केकेआर ने KKR विजय लक्ष १०व्या षटकात पूर्ण केले.


बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने Devdutt Padikkal सर्वाधिक २२ धावांची खेळी केली.

याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसल यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

लॉकी फर्ग्यूसनने २ गडी तर प्रसिद्ध कृष्णाने १ गडी बाद केला.


या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक KKR Vs RCB जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, हा निर्णय त्यांच्या अंगलट येत आहे.

बेंगलोरने दुसऱ्या षटकात कर्णधार विराट कोहलीची virat kohli विकेट गमावली होती.

देवदत्त पडीक्कलसह सलामीला फलंदाजीला आलेला विराट केवळ ५ धावा करुन प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

त्याने डीआरएसचा वापर केला, पण यात तो बाद झाल्याचे स्पष्ट दिसले.
त्यानंतर पदार्पणवीर केएस भरतने देवदत्तची साथ देण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांचीही जोडी फार काळ टिकली नाही. देवदत्त ६ व्या षटकात २२ धावांवर लॉकी फर्ग्यूसन विरुद्ध खेळताना बाद झाला.

त्यानंतर केएस भरतला ९ व्या षटकात आंद्रे रसलने १६ धावांवर शुबमन गिल करवी झेलबाद केले.

याच षटकात अनुभवी डिव्हिलियर्स पहिलाच चेंडू खेळताना शून्यावर त्रिफळाचीत झाला.त्यामुळे बेंगलोरची अवस्था १० षटकांनंतर ४ बाद ५४ धावा अशी झाली. त्यानंतरही बेंगलोरकडून कोणाला मोठी खेळी करता आली नाही.

१२ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेल आणि या सामन्यातून पदार्पण केलेल्या वनिंदू हसरंगाला वरुण चक्रवर्तीने माघारी धाडत बेंगलोरला दुहेरी धक्का दिला. मॅक्सवेल १० धावांवर आणि हसरंगा शून्यावर बाद झाला.

आणखी वाचा :CSK Vs MI मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर चेन्नईचा मुंबईवर २० धावांनी विजय


त्यापाठोपाठ १४ व्या षटकात सचिन बेबीला ७ धावांवर चक्रवर्तीनेच बाद केले. काईल जेमिसन १६ व्या षटकात ४ धावांवर धावबाद झाला. तर, १६ व्या षटकात हर्षल पटेलला फर्ग्यूसनने १२ धावांवर बाद केले. अखेर १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराज ८ धावांवर रसेलविरुद्ध खेळताना बाद झाला. याबरोबरच बेंगलोरचा डाव ९२ धावांवर संपुष्टात आला.


KKR Vs RCB केकेआर संघाकडून गिलच्या ४८ धावा तर आयरच्या नाबाद ४१ धावांच्या जोरावर संघाने विजय लक्ष १०व्या षटकात एक गडी गमावून पार केले. आरसीबी कडून चाहलने एक गडी बाद केला. उद्याचा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघ दरम्यान रंगेल.
 

Share this story