krida purskar;राष्ट्रपती भवनात क्रीडा पुरस्कार प्रदान
krida purskar

 गौरव डेंगळे

krida purskar;क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या खेळाडू,प्रशिक्षकांना आज क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात क्रीडा पुरस्कारांचे krida puraskar वितरण करण्यात आले.

दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात.

यामध्ये खेलरत्न,अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार,जीवनगौरव पुरस्कार,राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार,मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार यांचा समावेश आहे.

हॉकीचे जादूगार म्हटल्या जाणार्‍या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीर होत असले तरी यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमुळे या पुरस्कारांची घोषणा लांबणीवर पडली.

क्रीडा जगतातील सर्वोच्च मानाचा खेलरत्न पुरस्कार यंदा १२ खेळाडूंना देण्यात आला.

एकाच वेळी इतक्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या ११ खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली,त्यानंतर हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगचे नावही त्यात जोडले गेले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला हा पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय पुरुष कुस्तीपटू रवी दहिया,महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश,

पॅरालिम्पिक पदक विजेता नेमबाज अवनी लेखरा,पॅराथलीट सुमित अँटिल,पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत,कृष्णा नागर, पॅरा नेमबाज मनीष नरवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, हॉकी संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

krida purskar;३५ जणांना अर्जुन पुरस्कार Arjun award

त्याचबरोबर एकूण ३५ जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बहुतेक खेळाडू हॉकीमध्ये गुंतलेले आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.या वेळी संघ कांस्यपदकासह परतला.

त्याचबरोबर महिला संघाने प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कांस्यपदकाच्या लढतीत त्याचा पराभव झाला.

दिलप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग,रुपिंदर पाल सिंग,सुरेंद्र कुमार,अमित रोहिदास,बिरेंदर लाक्रा,सुमित, नीलकांत शर्मा,

हार्दिक सिंग, विवेक सागर सिंग,गुरजंत सिंग, मनदीप सिंग,ललित कुमार उपाध्याय,वरुण कुमार हे पुरुष संघात आहेत.

त्याचबरोबर क्रिकेटर शिखर धवनच्या नावाचाही यात समावेश आहे.या यादीत तलवारबाज भवानी देवीसह अनेक पॅरा अॅथलीट्सचाही समावेश आहे.

aus vs pak ICC World Twenty20 त्या झेल ने केला पाकिस्तानचा गेम

 krida purskar;द्रोणाचार्य पुरस्कार Dronacharya award

sports award लाइफ टाइम श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रशिक्षकांमध्ये

अॅथलेटिक्स प्रशिक्षक टीपी ओसेफ, क्रिकेट प्रशिक्षक सरकार तलवार यांचा समावेश आहे.

यामध्ये हॉकी प्रशिक्षक सरपाल सिंग,कबड्डी प्रशिक्षक आशा कुमार आणि जलतरण प्रशिक्षक तपनकुमार पाणिग्रही यांच्या नावाचाही समावेश आहे.

द्रोणाचार्य पुरस्काराच्या नियमित श्रेणीत अॅथलेटिक्स प्रशिक्षक राधाकृष्णन नायर, बॉक्सिंग प्रशिक्षक संध्या गुरुंग,

हॉकी प्रशिक्षक प्रीतम सिवाच, पॅरा नेमबाजी प्रशिक्षक जय प्रकाश नौटियाल,टेबल टेनिस प्रशिक्षक सुब्रमण्यम रमण याचा हि सामावेश आहे.

जीवनगौरव पुरस्कार lifetime award

sports award जीवनगौरव पुरस्कारांच्या यादीत प्रशिक्षक लेख केसी, बुद्धिबळ प्रशिक्षक अभिजित कुंटे,

हॉकी प्रशिक्षक दविंदर सिंग गर्चा, कबड्डी प्रशिक्षक विकास कुमार, कुस्ती सज्जन सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.खेलरत्न पुरस्कारात २५ लाख रुपये रोख, पदक आणि सन्मानपत्र दिले जाते.

अर्जुन पुरस्कारामध्ये १५ लाख रुपये,एक कांस्य पुतळा आणि सन्मान प्रमाणपत्र आहे. यावेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर,पूर्ववर्ती कॅरेन रिजिजू आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

Share this story