maharashtra keari kusti I कोण झाला विजेता?
 महाराष्ट्र केसरी कुस्ती

Ahmednagar news

 उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा पाथर्डी येथे समारोप झाला.  

अहमदनगरच्या सुदर्शन कोतकर या सुपुत्राने उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला. ४० मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीने प्रेक्षकांचे मने जिंकली.

 उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाथर्डी येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद,

अहमनगर जिल्हा तालीम संघ व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सह. साखर कारखाना यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या.

खुल्या गटातील अंतिम फेरीत नाशिक येथील बाळू बोडखे याचा पराभव कोतकर याने केला तर या गटात तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला. 

बाळू बोडखे, नाशिक व सुदर्शन कोतकर अहमदनगर यांच्यात  अंतिम लढत होऊन उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेता सुदर्शन कोतकर हा उत्तर महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला.

तर बाळू बोडखे हा उपविजेता ठरला आहे.

चित्त थरारक कुस्त्यांचे सामने दोन दिवस कुस्ती प्रेमींना पहायला मिळाले.

केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड प्रताप ढाकणे व तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते या अंतीम कुस्तीला सुरवात करण्यात आली.

पारितोषिक वितरण समारंभ अँड प्रताप ढाकणे,वैभव लांडगे,काशिनाथ पाटील लवांडे,शिवशंकर राजळे,रफिक शेख,

गहिनीनाथ शिरसाट ,डॉ. दीपक देशमुख,सिद्धेश ढाकणे, बंडु बोरुडे, देवा पवार, योगेश रासने,क्रीडा शिक्षक राजेंद्र शिरसाट ,

प्रा.अजय शिरसाट,बाळासाहेब फलके,नंदकुमार दसपुते यांच्या उपस्थितीत पार पडला.

उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती कुठे ?

पाथर्डी येथील या कोतकर आणि बोडखे यांच्यातील रंगदार कुस्ती सुमारे चाळीस मिनटे चालली.

अखेर सुदर्शन याने पाय लावून घिस्सा हा डाव मारून कोतकर याने बोडखेयांचावर विजय मिळवला.

दोघांच्या वजनामधे सुमारे पंचवीस किलोचा फरक होता.बोडखे उपविजेता ठरला असला तरी त्याने चपळ आणि चतुर खेळाव्दारे कुस्तीप्रेमींच्या मनामधे घर केले.

मात्र शांतपणे खेळणारा सुदर्शन कोतकर याने अखेरच्या क्षणी मात केली.समर्थकांनी कुस्ती झाली नाही असे सांगत अक्षेप नोंदविला.

मात्र आपण जिंकल्याची दाद कोतकर याने पंचाकडे मागितल्या नंतर पंचाने या लढतीचे चित्रीकरण तपासून कोतकर याला विजयी घोषित केले.

कोतकर याला चांदीची गदा व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या शिवाय

उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा निकाल असा-

४८ किलो वजनगट- संतोष सतरकर प्रथम, अंकुश भडांगे व्दीतीय , वैभव तुपे तृतीय .

५८ किलोवजनगट- पवन ढोन्नर प्रथम,शुभम मोरे व्दीतीय , महेश शेळके तृतीय.

६५ किलो वजनगट- सुजय तनपुरे प्रथम, भाऊसाहेब सदगीर व्दीतीय , अशोक पालवे तृतीय.

७४ किलो वजनगट- महेश फुलमाळी प्रथम, संदीप लटके व्दीतीय , वैभव आकाश घोडके तृतीय .

८४ किलो वजनगट- ऋषीकेश लांडे प्रथम, विजयपवार व्दीतीय .

खुल्या गटातील विजेते व उत्तर महाराष्ट्र केसरी असे- सुदर्शन कोतकर (अहमदनगर) , उपविजेते- बाळु बोडखे ( नाशिक) , अनिल ब्राम्हणे( अहमदनगर ) असा निकाल लागला आहे.

स्पर्धेचे पंच म्हणून हरियाणा येथील सनी चौधरी,विशाल जाधव,कैवल्य बलकवडे यांनी काम केले.

तर कुस्तीचा दांडगा अभ्यास असलेले सांगली येथील शंकर अण्णा पुजारी उत्कृष्ठ समालोचन करून सर्वांची मने जिंकली.

यावेळी डॉ.राजेंद्र खेडकर, राजेंद्र नागरे, बाळासाहेब ढाकणे, शिवाजी बडे, एम.पी. आव्हाड व एकलव्य परीवारातील सर्वच कार्यकर्ते उपस्थीत होते.

Read More :केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची कर्तव्यदक्षता

जिल्ह्यातील कुस्तीगिरांना आश्रय देणारे अँड. प्रतापराव ढाकणे यांना अहमदनगर तालीम संघाच्या वतीने गौरविण्यात आले.

अतिशय चांगले नियोजन करुन ढाकणे यांनी मल्लांना दिलेला आधार कुस्तीच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील

असे गौरवोद्गार यावेळी महाराष्ट्र केसरी असलेले असोकराव शिर्के व गुलाबराव बर्डे यांनी काढले.

उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत झाली यामध्ये सुदर्शन कोतकर हा उत्तर केसरी किताबाचा मानकरी ठरला. त्याला रोख बक्षीस व चांदीची गदा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

Share this story