MI vs KKR, IPL 2021 राहुल त्रिपाठी,व्यंकटेश अय्यरच्या सूरेख खेळीच्या जोरावर केकेआरचा एमआयवर ७ गडी राखून विजय.
MI vs KKR, IPL 2021


दुबई २४/९ (गौरव डेंगळे)


MI vs KKR,IPL 2021 राहुल त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर सुरेख खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) जायद स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला.


या विजयासह,केकेआर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे,तर मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानावर घसरला आहे.


या सामन्यापूर्वी केकेआरचा मुंबई इंडियन्स MI vs KKR, IPL 2021 विरुद्ध निराशाजनक रेकॉर्ड होता, केकेआर व मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या एकूण २८ सामन्यांमध्ये केकेआर ने फक्त ६ विजय नोंदवले होते,परंतु अय्यर आणि त्रिपाठी यांच्या फलंदाजीमुळे केकेआरचे नशीब बदले.

१५६ धावांचा पाठलाग करताना केकेआर शुभम गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी ३ षटकांत ४० धावांची भागीदारी आक्रमक भागीदारी केली.
मात्र,३ षटकात जसप्रीत बुमराहने गिलला (१३) त्रिफळाचीत करुन केकेआरचा सलामी फलंदाज बाद केला.

पॉवरप्लेच्या शेवटी,केकेआर ने ६ षटकात ६७/१ पोहचवली.

आणखी वाचा :IPL 2021, DC vs SRH,दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला; गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा मिळवले

अय्यर आणि त्रिपाठी यांनी मुंबईच्या गोलांदाजवर आक्रमण सुरू ठेवले व दोघांनी आपापली अर्धशतके पुर्ण केली.

दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली.

अखेर,बुमराहने ही भागीदारी फोडली त्याने अय्यर (५३) ला बाद केले त्यावेळी केकेआरला विजय मिळवण्यासाठी आणखी २८ धावाची गरज होती.शेवटी, त्रिपाठी (७४) आणि नितीश राणा (५) यांनी केकेआरला २९ चेंडू शिल्लक असताना ७ गडी विजयी केले.


तत्पूर्वी, क्विंटन डी कॉकच्या ५५ धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत १५५/६ अशी मजल मारली.

रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या ६ षटकांत ५६ धावांची भागीदारी केल्याने मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली.

रोहित आणि डी कॉकने सुरुवातीच्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली.

१० व्या षटकात सुनील नरेनने रोहितला (३३) बाद करत ही भागीदारी फोडली.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला सूर्यकुमार यादव लवकर बाद झाला.

प्रसिध्द कृष्णाने त्याला ५ धावांवर बाद केले. दोन षटकांनंतर, डी कॉक (५५) देखील बाद झाला.

मुंबईसाठी सर्वात मोठी निराशा ईशान किशनने केले,तो संपूर्ण हंगाम पुन्हा एकदा अयशस्वी ठरला.

किशन (१४) ने आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर एक लांब षटकार मारला खरा,पण लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर पुढच्या षटकात तो बाद झाला.
शेवटी, किरॉन पोलार्डने १५ चेंडूत २१ धावा केल्या व मुंबईचा धावफलकने १५० धावांचा टप्पा ओलांडला.

मुंबईची मधली फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली.


MI vs KKR,IPL 2021:.


संक्षिप्त गुण: मुंबई इंडियन्स १५५/६ (क्विंटन डी कॉक ५५, रोहित शर्मा ३३; लॉकी फर्ग्युसन २-२७) विरूद्ध केकेआर १५९/३ (राहुल त्रिपाठी ७४*, वेंकटेश अय्यर ५३, जसप्रीत बुमराह ३-४३).

Share this story