MI vs PBKS IPL 2021: हार्दिक पंड्याच्या अक्रमक खेळीने मुंबई विजयी
MI vs PBKS IPL 2021

अबू धाबी:(गौरव डेंगळे,२९/९)

MI vs PBKS, IPL 2021:हार्दिक पंड्याने आपल्या अक्रमक फलंदाजीची झलक दाखवत त्याने मुंबई इंडियन्सचा MI  प्ले-ऑफ आशा जिवंत ठेवल्या.त्याच्या या खेळी ने गतविजेत्यां मुंबईने आयपीएल IPL 2021, सामन्यात पंजाब किंग्जला PBKS ६ गडी राखून पराभूत केले.हार्दिकने मोहम्मद शमीने टाकलेल्या १९ षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारल्याने त्याने ३० चेंडूत नाबाद ४० धावा केल्याने एमआयने
 मागील ३ सामन्यांच्या पराभवाचा मलिका १९ षटकांत १३६ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करत पराभवाची मलिका संपवली.
सौरभ तिवारी (३७ चेंडूत ४५) आणि किरॉन पोलार्ड (नाबाद १५) यांनीही मुंबईच्या विजया मध्ये महत्वची खेळी केली.
पंजाबच्या २ गडी बाद करणाऱ्या पोलार्डने १८व्या षटकात युवा डावखुरा अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर १ षटकार व चौकार लगावले. या विजयानंतर, मुंबई इंडियन्स ११ सामन्यांत १० गुणांसह ५ स्थानावर पोहोचला, तर पंजाब ६ स्थानावर घसरला.
पंजाबचा लेगस्पिनर रवी बिश्नोईने रोहित शर्मा (८) आणि सूर्यकुमार यादव (०) ला सलग चेंडूंत बाद करत मुंबईला संकटात आणले होते.तिवारी आणि क्विंटन डी कॉक (२७) यांनी पॉवरप्लेमध्ये संघाला २ बाद ३० वर नेले.
तिवारीने कव्हर-पॉइंट क्षेत्रावरील चौकारासह दबाव कमी केला, 
डी कॉक, चागल्या फॉर्म मध्ये दिसत असताना १०व्या षटकात बाद झाला.नॅथन एलिसने तिवारीला बाद केले.त्यानंतर हार्दिकने शमीच्या २ चेंडूत १ चौकार आणि षटकार खेचून एमआयला विजयच्या जवळ नेले.
शेवटच्या ३ षटकांत २९ धावांची गरज असताना,पोलार्ड व हार्दिक ने विजयी लक्ष्य ६ चेडू बाकी ठेऊन पार केले.
तत्पूर्वी,मार्करामने दीपक हुड्डा (२८) सोबत ६१ धावांची भागीदारी करत ४ बाद ४८ वरून पंजाबचा धावफलक उंचावला. दक्षिण आफ्रिके मार्कराम १६व्या षटकात बाद झाल्यानंतर पंजाबला एकही चौकार मारता आला नाही,शेवटच्या ४ षटकांत २३ धावा केल्या.पोलार्ड (२/८) व बुमराह (२/२४) यांनी सुरेख गोलंदाजी केली त्यांना कृणाल पंड्या (१/२४), राहुल चहर (१/२७) व नॅथन कुल्टर-नाईल (०/१९) यांनी चांगली साथ दिली. .याआधी, कृणाल पंड्याने पंजाबला MI vs PBKS पहिला धक्का देत मनदीप सिंग (१५) वर बाद केले. त्यानंतर पोलार्डने ख्रिस गेलला घरचा रस्ता दाखवला.
दोन चेंडूंनंतर,पोलार्डने राहुल बाद करत टी -२० मध्ये ३०० वी बळी मिळवला.बुमराहने निकोलस पूरनला बाद केले.त्यावेळी पंजाबची धावा होत्या ८व्या षटकात ४ बाद ४८.
त्यानंतर मार्कराम आणि हुड्डा यांनी धावफलक हलता ठेवला, दोघांनी एकेरी, दुहेरी धावांनी पंजाबला १४ षटकांत ४ बाद ९० वर नेले. पंजाबला शेवटचा षटका पर्यंत आक्रमक फलंदाजी करता आली नाही.मार्कराम आणि हुड्डा यांच्यानंतर पंजाबचा कुठलाही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर धावा करू शकला नाही व पंजाब संघ २० षटकात माफक १३५ धावा करू शकला.
MI vs PBKS संक्षिप्त धावफलक 

MI vs PBKS पंजाब : २० षटकात ६/१३५ (मार्कराम ४२, हुड्डा २८, पोलार्ड २/८)
मुंबई : १९ षटकात ४/ १३७ (तिवारी ४५, हार्दिक ४०*,बिश्नो

Share this story