PBKS vs SRH,IPL 2021:पंजाबचा हैदराबादवर ५ धावांनी विजय
 PBKS vs SRH,IPL 2021


शारजा -प्रतिनिधी 
 PBKS vs SRH,IPL 2021,२० षटकांत १२५/७ धावसंख्या नोंदवल्यानंतर पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी

शारजामध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५ धावांनी थरारक विजय मिळवला.


सनरायझर्स संघ १२०/७ धावा करू शकला.जेसन होल्डर २९ चेंडूत ४७ धावांवर नाबाद राहिला.
चाहत्यांना शारजाहमध्ये कमी धावसंख्येचा थरारक सामना बघायला मिळाला.
सनरायझर्स संघाला  PBKS vs SRH १२० चेंडूत जिंकण्यासाठी १२६ धावांची गरज होती. पण त्यांची

सुरवात अतिशय खराब झाली.
मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नर (२) तर केन विल्यमसन (१) झटपट बाद केले. त्यानंतर रवी बिश्नोईने

मनीष पांडेला गुगली टाकून बाद केले.त्यानंतर केदार जाधव (१२) आणि अब्दुल समद (१) लवकरच

तंबूत परतले.रवी बिश्नोईने ३ गडी बाद केले.

आणखी वाचा :शाळा सुरू करण्यास ४ आँक्टोबरपासून टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांची मान्यता


 रिद्धीमान साहा ३१ धावांवर बाद झाल्यानंतर होल्डरने जबाबदारी स्वीकारली व त्याने २९ चेंडूत ४७

धावा केल्या. त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरली व पीबीकेएस  

PBKS vs SRH ५ धावांनी सामना जिंकला.तत्पूर्वी पंजाब किंग्सने  PBKS सुरुवात अतिशय

खराब झाली. के एल राहुल (२१) आणि मयंक अग्रवाल (५) हे दोन्ही सलामीवीर जेसन होल्डरने

एकाच षटकात बाद केले. काही अंतराने ख्रिस गेल (१४) आणि निकोलस पूरन (८) अनुक्रमे

राशिद खान आणि संदीप शर्मा यांनी बाद केले. आयडीन मार्क्राम (२७)ने पीबीकेएस

 PBKS vs SRH संघाकडून सर्वाधिक धावसंख्या केली.होल्डरचा ३/१९ गोलंदाजीमुळे

हैद्राबादने पंजाबलाला १२५/७ या धावसंख्यावर मर्यादित ठेवण्यास मदत केली.

Share this story