RCB vs CSK, IPL 2021,चेन्नईचा बंगलोरवर ६ गडी राखून विजय
RCB vs CSK, IPL 2021,चेन्नईचा बंगलोरवर ६ गडी राखून विजय

दुबई:२५/९ (गौरव डेंगळे)

RCB vs CSK, IPL 2021,चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा विजयाची मालिका सुरू ठेवली.एमएस धोनीच्या संघाने शारजामध्ये रॉयल चॅलेंजर्स Rcb बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १५६ धावा केल्या,ज्याच्या प्रत्युत्तरात सीएसकेने १८.१ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.
RCB vs CSK, IPL 2021 आरसीबीचे मधल्या फळीतील अपयश-विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीसाठी दमदार सुरुवात केली. दोघांनी १३.२ षटकांत १११ धावांची भागीदारी केली. दोघांनीही अर्धशतके झळकावली, पण त्यांच्याशिवाय एकही फलंदाज वेगवान धावा करू शकला नाही. डिव्हिलियर्स (१२), मॅक्सवेल (११) आणि टीम डेव्हिड (१) मोठे योगदान देण्यात अपयशी ठरले आणि संघाने शेवटच्या ७ षटकांमध्ये फक्त ४५ धावा केल्या,ज्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
शार्दुलची  सामना बदलणार षटक  - गेल्या दीड वर्षात सातत्याने आपल्या गोलंदाजीने सामन्याची दिशा बदलणारा शार्दुल ठाकूर याने सिद्ध केले आहे. त्याने अलीकडच्या काळात टीम इंडियासाठी अशी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.आरसीबीच्या RCB विरोधात त्याने हेच केले.सुरुवातीच्या षटकांत धावा काढल्यानंतर शार्दुलने चांगले पुनरागमन केले आणि त्याच्या शेवटच्या षटकात सामना बदलला. १७ व्या षटकात गोलंदाजी करताना शार्दुलने पाचव्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्सला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला आणि पुढच्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कलही चालते केले.
गेल्या अनेक सीझनपासून चेन्नईच्या डेथ बॉलिंगचा जीव बनलेला विंडीजचा दिग्गज ब्राव्होने पुन्हा एकदा तेच केले. प्रथम, ब्राव्होने विराट कोहलीला बाद करत बंगलोरला मोठा धक्का दिला. त्यानंतर शेवटच्या २ षटकांत केवळ १२ धावा देऊन २ गडी बाद केले.यामध्ये त्याने २० व्या षटकात फक्त २ धावा दिल्या व २ गडी बाद केले. ब्राव्होने ४ षटकांत फक्त २४ धावा देत ३ गडी बाद केले.
Csk सीएसकेच्या दोन महत्त्वाच्या भागीदारी - आरसीबीसाठी, विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल वगळता कोणतीही महत्त्वाची भागीदारी होऊ शकली नाही. तुलनेत, चेन्नईसाठी, ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने सलामीला ७१ धावांची शानदार भागीदारी केली. यानंतर मोईन अली आणि अंबाती रायडू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी फक्त ४.५ षटकांत ४७ धावांची जलद भागीदारी झाली,ज्यामुळे खेळाचा रंग बदलला.

संक्षिप्त धावफलक: बेंगलोर २० षटकात ६/१५६ (देवदत्त पडिक्कल ७०, विराट कोहली ५३ ,ब्राव्हो ३/२४)
चेन्नई १८.१ षटकात ४/१५७ (ऋतुराज गायकवाड ३८, अंबाती रायडू ३२ , पटेल २/२५)

Share this story