RCB vs KKR,IPL 2021,सुनील नरेनने दाखवला आरसीबीला घरचा रस्ता
RCB vs KKR,IPL 2021,

गौरव डेंगळे (१२/१०)

दुबई
RCB vs KKR,IPL 2021,सुनील नरेनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकत्ताचा बेंगलोरवर ४ गडी राखून विजय झाला. 
 या विजयामुळे कोलकात्याची दुसऱ्या क्वालिफायर सामन्यांमध्ये दिल्लीशी गाठ पडणार आहे.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय यावेळी आरसीबी RCB संघाचा कर्णधार विराट कोहलीचा पूर्णपणे चुकला.

कोलकाता नाईट रायडर्सने KKR रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला शारजामधील एलिमिनेटर लढतीत १३८/७ धावावर रोखले.

सुनील नरेनने २१ धावा देऊन ४ गडी बाद केले. कोहली (३९), भरत (९), डिव्हिलर्स (११) व मॅक्सवेल (१५) या चार आरसीबीच्या महत्वपूर्ण खेळाडूंना त्याने बाद केले.नरीन सोबत लॉकी फर्ग्युसननेही २ गडी बाद केले. आरसीबीसाठी विराट कोहली (३९) सर्वाधिक धावा करणारा ठरला.

सलामीवीर कर्णधार कोहली व पडीक्कल यांच्यात पहिल्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी झाली.पडीक्कल २१ धावा करुन बाद झाला.कोहली व पडीक्कल यांच्यानंतर आरसीबीचा कुठलाही फलंदाज केकेआरच्या गोलंदाजी समोर टिकाव धरू शकला नाही.

MI vs SRH,IPL 2021,विजयानंतरही मुंबई इंडियन्स आयपीएल प्रवास समाप्त.


१३९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात झालेल्या कोलकत्ता संघाची सुरुवात चांगली झाली. सलामी फलंदाज गिल व आयरने पहिल्या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी केली. गिल २९ व आयर २६ धावा करुन बाद झाले. त्यानंतर त्रिपाठी (६) व कार्तिक (१०) धावा करुन झटपट बाद झाले.

निर्णायक क्षणी सुनिल नारेनच्या १५ चेंडूत २६ धावा व नितीश राणाच्या २३ धावा मुळे कोलकत्ता संघ विजयाच्या समीप पोहोचला. सुनील व नितेश बाद झाल्यानंतर मॉर्गन व शकीबुलने विजयी लक्ष १९.४ षटकात पुर्ण केले.

आरसीबी कडून सिराज, चहल व पटेल यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

RCB vs KKR,IPL 2021,संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स  RCB: २० षटकात ७/१३८ (कोहली ३८,पडीक्कल २१, सुनिल नारेन ४/२१)
नाईट रायडर्स KKR: १९.४ षटकात ६/१३९ (गिल २९, नारेन २६,पटेल २/१९)

 

Share this story