RCB vs PBKS highlights, IPL 2021,रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा किंग्स इलेव्हन पंजाबवर ६ धावांनी विजय
RCB vs PBKS highlights,

RCB vs PBKS highlights, IPL 2021,रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा किंग्स इलेव्हन पंजाबवर ६ धावांनी विजय

अबू धाबी ( गौरव डेंगळे,३/१०)


RCB vs PBKS highlights, IPL 2021,शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१ च्या

४८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने पंजाब किंग्सचा PBKS ६ धावांनी पराभव केला. 
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने RCB २० षटकांत ७ बाद १६४ धावा केल्या.पंजाबचा

सलामीवीर मयांक अग्रवाल (५७) च्या अर्धशतकी खेळीनंतरही लक्ष्याचा पाठलाग करताना

२० षटकात ६ बाद १५८ धावाच करू शकला.आरसीबीसाठी युझवेंद्र चहलने ३, तर जॉर्ज गार्टन

व शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने PBKS चांगली सुरुवात केली

व पहिल्या विकेटसाठी सलामीवीर मयंक व कर्णधार लोकेश राहुल यांनी ६६ चेंडूत ९१ धावांची भागीदारी केली.

राहुल (३९) ला बाद करत शाहबाजने ही शानदार भागीदारी संपवली.यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस

पूरनची खराब कामगिरी सुरू राहिली व तो ३ धावांवर बाद झाला. पहिल्या विकेटच्या भागीदारीनंतर पंजाबकडून

कोणतीही मोठी भागीदारी झाली नाही. चहलने मयांकला बाद करत पंजाब संघाला धक्का दिला.मयंकने ४२ चेंडूत

६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या.या हंगामात पंजाबसाठी आपला पहिला सामना खेळणारा

सर्फराज खान खाते न उघडता बाद झाला,त्यानंतर एडन मार्कराम (२०) व शाहरुख खान (१६) धावा केल्या.

मोईसेस हेन्रिक्स १२ धावांवर बाद झाला आणि हरप्रीत ब्रारने ३ धावा केल्या.तत्पूर्वी,आरसीबीने आपल्या डावाची

शानदार सुरुवात केली, सलामीवीर कर्णधार कोहली आणि देवदत्त पडिकलने पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची

मजबूत भागीदारी केली. हेनरिक्सने कोहलीला (२५) बाद करून ही भागीदारी मोडली. थोड्याच वेळात फलंदाजीला

आलेला डॅनियल ख्रिश्चन हे खाते न उघडता हेनरिक्सचा बळी पडला.नवीन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आला.

हेनरिक्सने पडिकलला बाद केले. यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या एबी डिव्हिलियर्स व मॅक्सवेल या जोडीने

चौथ्या गड्यासाठी फक्त ३९ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. सरफराज अहमदच्या जबरदस्त थ्रोने

डिव्हिलियर्सला (२३) धावबाद करून ही भागीदारी तोडली.यानंतर मॅक्सवेलने ३३ चेंडूत ३ चौकार आणि

४ उत्कृष्ट षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी खेळली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीचा

RCB डाव ढासळला. शाहबाज (८) व जॉर्ज गार्टन खाते न उघडता बाद झाले, तर हर्षल पटेल (१)

व श्रीकर इंडिया नाबाद राहिले. PBKS पंजाबकडून मोहम्मद शमी व हेनरिक्सने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

READ MORE :women cricket 2021 ऑस्ट्रेलिया  व भारत यांच्यातील गुलाबी चेंडू कसोटी सामना अनिर्णित,स्मृती मांधना वुमन ऑफ द मॅच

RCB vs PBKS highlights, IPL 2021,संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर RCB: २० षटकात ७/१६४ ( ग्लेन मॅक्सवेल ५७, देवदत्त पदिक्कल ४०, हेनरिक्स ३/१२)
किंग्स इलेव्हन पंजाब PBKS : २० षटकात ६/१५८ ( मयांक अगरवाल ५७, के एल राहुल ३९, चहल ३/२९)

 

Share this story