RR vs MI,IPL 2021,राजसथानचा पराभव करत मुंबई इंडियन्सने प्ले ऑफ मध्ये खेळण्याचा अशा ठेवल्या जिवंत.
RR vs MI,IPL 2021

गौरव डेंगळे (६/१०)
अबु धाबी,

RR vs MI,IPL 2021,इंडियन प्रीमियर लीगच्या ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ९ गडी बाद ९० धावा केल्या,हे लक्ष्य मुंबई संघाने ८.२ षटकांत २ गडी गमावून पुर्ण केले.
इशान किशनला गवसला सुर.किशनने २५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. 
तत्पूर्वी जिमी नीशम व नॅथन कूल्टर-नाईल यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या करा या मरोच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला ९ बाद ९० वर रोखले.


इशान किशन फॉर्ममध्ये परतला.
राजस्थान रॉयल्स RRवर विजयानंतर मुंबई संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशा कायम ठेवल्या.

मुंबई इंडियन्सचा MIकर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,जो त्याच्या गोलंदाजांनी योग्य सिद्ध केला.

रॉयल्स संघ ९ बाद ९० धावा करू शकला व मुंबईने हे लक्ष्य ८.२ षटकांत २ विकेट गमावून पुर्ण केले.

फॉर्ममध्ये परतताना इशानने २५ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या.

चेतन साकरियाला ८ व्या षटकात २ षटकार ठोकल्यानंतर त्याने प्रथम नवव्या षटकात मुस्तफिजुर रहमानला चौकार ठोकला व नंतर षटकार ठोकून त्याच्या अर्धशतकाची आणि संघाच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.मुंबई संघ आता पाचव्या क्रमांकावर आहे.

या विजयानंतर मुंबईचे १३ सामन्यात १२ गुण आहेत तर कोलकाता नाईट रायडर्सचेही समान गुण आहेत,

परंतु चांगल्या धावसंख्येच्या आधारे ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.

मुंबईला पुढील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तर रॉयल्सला केकेआर यांच्याशी खेळायचे आहे.

दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

रॉयल्सचा डाव ४ षटकांतच उध्वस्त झाला.


RR vs MI,IPL 2021,आयपीएलच्या यूएई लेगमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या नीशमने १२ धावांत ३ गडी बाद केले.

त्याने खेळपट्टीवरील मदतीचा पुरेपूर फायदा घेतला कारण इथे चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नव्हता. कुल्टर-नाईलने ४ षटकांत १४ धावा देऊन ४ गडी बाद केले.

नीशम व कुल्टर-नाईलने फक्त २६ धावा देत ७ गडी बाद केले.जसप्रीत बुमराहने १४ धावा देऊन २ गडी बाद केले.

रॉयल्सचा डाव ४ षटकांतच उध्वस्त झाला.एक क्षणी त्याची धावसंख्या १ बाद४१ अशी होती.

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ५० धावांच्या आत राजस्थानचे ५ गडी बाद झाले.त्यानंतर मुंबईने पुर्ण सामन्यात मुंबई संघाचे वर्चस्व राहिले.

RR vs MI,IPL 2021,संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स  RR: २० षटकात ९/९० (इविन लेवीस २४,कुल्टर-नाईल ४/१४)
मुंबई इंडियन्स MI: ८.२ षटकात २/९४ (ईशांत किशन ५०*, मुस्ताफिर १/३२)

Share this story