RR VS RCB, IPL 2021,राजस्थान रॉयल्स गेम ओवर?
RR VS RCB, IPL 2021,

RR VS RCB, IPL 2021,राजस्थान रॉयल्स गेम ओवर?

(अबू धाबी) गौरव डेंगळे:

RR VS RCB, IPL 2021,:आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने RCB राजस्थान रॉयल्सचा RR एकतर्फी  सामन्यात ७ गडी राखून पराभव केला.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १४९ धावा केल्या.

बंगळुरूने हे लक्ष्य केवळ १७.१ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.ग्लेन मॅक्सवेलने बेंगळुरूच्या विजयात ३० चेंडूत नाबाद ५० धावाची आक्रमक खेळी केली.

श्रीकर भारतने ही ४४ धावांची योगदान दिले.याशिवाय बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलने ३ आणि युझवेंद्र चहल-शाहबाज अहमदने २-२ बाद केले.

बंगलोरच्या या विजयानंतर आयपीएल पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

चेन्नई आणि दिल्लीचे प्रत्येकी १६ गुण झाले आहेत. चेन्नई पहिल्या व दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याचवेळी, बेंगळुरूने ११ सामन्यांमध्ये ७ वा विजय नोंदवून आपला नेट रन रेट सुधारला आहे.

केकेआरकडून झालेल्या पराभवानंतर बंगळुरूचा नेट रन रेट लक्षणीय घसरला होता पण आता त्याचे १४ गुण झाले आहेत.

बंगळुरूचा नेट रन रेट आता -०.२०० आहे. एवढेच नाही तर या विजयानंतर त्याने त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्सपासून ४ गुणांचे पुढे आहेत.

RR VS RCB, IPL 2021,आजच्या पराभवाने राजस्थान रॉयल्सचा 'गेम ओव्हर'.

राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले तर बेंगळुरूविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशेला धक्का बसला आहे.

राजस्थानचे आता ११ सामन्यात फक्त ८ गुण आहेत. त्याचा नेट रन रेट देखील घसरून ०.४६८ झाला आहे.

आता या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित ३ सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

संघाचे खेळ स्वरूप पाहून असे होणे अशक्य वाटते.तसे, प्लेऑफची शर्यत आता अधिक रोमांचक बनली आहे.

ही लढत चौथ्या क्रमांकासाठी आहे ज्यात कोलकाता-मुंबई आणि अगदी पंजाब, राजस्थान यांच्यातही चुरशीची स्पर्धा आहे, राजस्थानला त्यापासून दूर ठेवता येणार नाही.

RR VS RCB, IPL 2021,संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स: २० षटकात ९/१४९ (एविन लेविस ५८, यशस्वी जस्वल ३१, हर्षल पटेल ३/३४)

बंगलोर रॉयल चॅलेंजर्स: १७.१ षटकात १५३/३ (ग्लेन मॅक्सवेल ५०*, श्रीकर भारत ४४, मुस्तफिर रेहमान २/१०)

Share this story