RR vs SRH,IPL 2021,सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला
RR vs SRH,IPL 2021,

दुबई (गौरव डेंगळे २७/९)

RR vs SRH,IPL 2021,आईपीएल मधील ४० वा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला.या सामन्यात SRH,सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा RR७ गडी राखून पराभव केला.


राजस्थान साठी करो या मरो असलेल्या हैद्राबादने त्याचा पराभव करून प्ले ऑफ मध्ये खेळण्याची राजस्थानची अशा संपवली. 


सनरायजर्स हैद्राबाद SRH यंदाच्या हंगामात ९ पैकी ८ सामने गमावल्याने उर्वरित सामने जिंको अथवा हरो त्यामुळे ते काही प्ले ऑफ साठी पात्र ठरणार नव्हते पण हैद्राबादने राजस्थानला आपल्या बरोबर स्पर्धेतून बाद केले.


    तत्पूर्वी सामन्यात नाणफेक जिकत राजस्थानने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला विकेट त्वरीत गेल्यानंतर कर्णधार संजूने यशस्वीसोबत अर्धशतकी भागिदारी केली. 

    त्यानंतर कर्णधार संजू शेवटच्या षटकापर्यंत मैदानात होता. त्याने ८२ धावांची दमदार खेळी केली.ज्यामुळे राजस्थानने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती.RR vs SRH हैद्राबाद संघाकडून सलामीवीर जेसन रॉयने दमदार ६० धावांची खेळी केल्यानंतर अखेरच्या षटकात सुरेख फलंदाजी करत केन विलियम्सने नाबाद ५१ धावांच्या मदतीने सामना हैद्राबादला जिंकवून दिला.

संक्षिप्त धावफलक : RR vs SRH राजस्थान रॉयल्स: २० षटकात ५/१६४ ( संजू सॅमसन ८२, यशअस्वी जयस्वाल ३६, सिद्धार्थ कौल २/३६)
सनरायझर्स हैदराबाद:१८.३ षटकात १६७/३ (जसोन रॉय ६०, केन विलियम्स नाबाद ५१, महिपाल १/२२)

 

Share this story