t20 world cup icc,भारताला उपांत्यफेरी गाठण झाले अवघड
t20 world cup icc,

गौरव डेंगळे: १/११/२१

दुबई:
t20 world cup icc,टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत व न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या स्वप्नांना मोठा धक्का दिला.

नाणेफेक हारल्यानंतर भारत फलंदाजीला आला पण सुरुवात अत्यंत खराब झाली व भारत केवळ ११० धावा करू शकला.न्यूझीलंडला केवळ १११ धावांचे लक्ष्य मिळाले,जे संघाने केवळ २ गडी गमावून सहज गाठले.

न्यूझीलंडच्या डावाची पहिली विकेट २४ धावांवर मार्टिन गप्टिलच्या रूपाने पडली,मात्र त्यानंतर डॅरिल मिशेल व केन विल्यमसन यांनी फलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला.


t20 world cup icc,भारतीय फलंदाजीचा फ्लॉप शो


न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना भारतासाठी जितका महत्त्वाचा होता,तितकीच भारतीय फलंदाजांची कामगिरी वाईट झाली.भारताने टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावा (११० धावा) केल्या.भारताची यापूर्वीची सर्वात कमी धावसंख्या २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १३०/४ होती.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ईशान किशन व केएल राहुल हे सलामीवीर पॉवर प्लेमध्ये केवळ ४ व १८ धावांवर बाद झाले.पॉवर प्ले संपेपर्यंत भारताची धावसंख्या ३५/२ होती.


क्रीजवर विराट कोहली आणि रोहित शर्माकडून आशा होती पण रोहित खराब शॉट खेळून अवघ्या १४ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीनेही वैयक्तिक ९ धावांवर ईश सोधीच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टकडे झेल देऊन बाद झाला.यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

अवघ्या १२ धावा केल्यानंतर पंतही अॅडम मिल्नेच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.यानंतर हार्दिक पांड्या (२३) आणि शार्दुल ठाकूर (०) यांच्या विकेटही लवकर पडल्या.शेवटी,रवींद्र जडेजाने काही प्रयत्न केले व १९ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा करत भारताची धावसंख्या ११०/७ पर्यंत नेली.


t20 world cup icc,आता भारताला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही गुण मिळालेला नाही. गट २ मध्ये अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानचे उपांत्य फेरीत प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे.अशा परिस्थितीत,पात्रता मिळवणारा दुसरा संघ न्यूझीलंड असू शकतो कारण आता न्यूझीलंडला उर्वरित तीन सामने कमकुवत संघांविरुद्ध खेळायचे आहेत, ज्यामुळे त्यांना पात्र ठरणे सोपे होईल.

Share this story