women cricket 2021 ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील गुलाबी चेंडू कसोटी सामना अनिर्णित,स्मृती मांधना वुमन ऑफ द मॅच
women cricket 2021

ऑस्ट्रेलिया (गौरव डेंगळे,३/१०)


women cricket 2021,एकमेव गुलाबी चेंडू कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाने

सामना निकाली बनवायचा प्रयत्न केला.
 शेवटचा दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलयाचा संघ २३४ धावांनी पिछाडीवर होता

व त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी ८६ धावांची आवश्यकता होती. 
काल नाबाद असलेली जोडी पेरी व गार्डनर पहिल्या सत्रात सुरेख फलंदाजी करत दोघींनीही आपले अर्धशतक पूर्ण केले.

५१ धावा काढल्यानंतर गार्डनरला शर्माने बाद केले. त्यानंतर सुथरलँड (३), मोलिनेउच (२), वेअरहाम (२), ब्राऊन (८)

हे चार बॅटर्स झटपट बाद झाले. एका बाजूने पेरी संयमी फलंदाजी करत होती,पण तिला कुठल्याही बॅटर्सने साथ दिली नाही.

भारताची मेघना सिंग व पूजा वस्त्राकर यांनी नियंत्रित स्विंग गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे शेपटी गुंडाळले.

शेवटी ६१ धावा करत पेरी नाबाद राहिली.ऑस्ट्रेलिया ने आपला पहिला डाव २४१/९ वर घोषित केला.

भारतकडून वस्त्राकरने ३,तर शर्मा, सिंग व गोस्वामी यांनी २-२ गडी बाद केले.रात्रीच्या जेवणानंतर,भारतीय

संघाने आपला दुसरा डाव सूरू केला. पहिल्या गड्यासाठी वर्मा व मांधना  smriti mandhana या सलामी जोडीने

७० धावांची भागीदारी रचली.३१ धावावर मांधनाला मोलीन्युझने बाद केले.भाटिया ३ धावा करून झटपट बाद झाली.

वर्मा ५२ धावा करून बाद झाली,तिला वारेहामने बाद केले.भारताने आपला दुसरा डाव ३ बाद १३५ धावावर घोषित

करुन ऑस्ट्रेलिया संघाला ३२ षटकात २७२ धावांचे लक्ष दिले.पूनम राऊत ४१ धावावर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली
व १५ षटकात २ गडी गमावून ३६ धावा करत हा कसोटी सामना अनिर्णित राहिला.


पहिल्या डावात १२७ धावा तर दुसऱ्या डावात ३१ धावा करणारी स्मृती मांधना smriti mandhana

हिला वुमन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

women cricket 2021,संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला क्रिकेट : पहिला डाव ८/३७७ घोषीत (स्मृती मांधना smriti mandhana १२७, दिप्ती शर्मा ६६, मोलिनुझ २/४५) व दुसरा डाव: ३/१३५ (शफली वर्मा ६१, वरेहाम १/१२)

आणखी वाचा :अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात लॉक डाऊन 

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट : पहिला डाव: ९/२४१ घोषीत (पेरी ६१, वास्त्रकर ३/४९) व दुसरा डाव : २/३६ (लांनिंन १७,वास्त्रकर १/१३)
 

Share this story