ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव विभागीय अधिकार्‍याकडे दाखल;आ.आजबे यांची सूचना

शेअर करा

‘त्या’बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव विभागीय अधिकार्‍याकडे दाखल;आ. आजबे यांची सूचना

आष्टी दि 3 डिसेंबर,प्रतिनिधी
आष्टी वनपरिक्षेत्र अंतर्गत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बिबट्याने नागरिकांवर हल्ले केले.नरभक्षक बनलेल्या ‘त्या’ बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव वन्यजीव विभागाकडे पाठविण्यात आला असून या संदर्भात आमदार बाळासाहेब आजबे यांनी सूचना केली होती.
आष्टी तालुक्यात तीन जणांना बिबट्याने ठार केले त्यानंतर दोन पेक्षा अधिक जणांना जखमी केले .या संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या भागाचा दौरा करून नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी परवानगी मागणार असल्याचे सूतोवाच केले होते.
त्यांनतर आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाठपुरावा करत वनमंत्री संजय राठोड व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्याला ठार मारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव विभागीय वन अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा:आज १७५ रुग्णांना डिस्चार्ज तर २४८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close