ताज्या घडामोडीमनोरंजन

*लॉकडाऊनमध्ये जमली कावळ्यांशी दोस्ती*

शेअर करा

राजेश राऊत

कडा

लॉकडाऊन काळात शाळेत खाण्याच्या अपेक्षेने येणाऱ्या कावळ्यांना खाऊ घालून कडा येथील बाळू अनेचा यांनी कवळ्यांशी अनोखी मैत्री केली आहे .

कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयाचा परिसर तसा झाडांनी व्यापलेला . त्यामुळे झाडावर अनेक पक्षांचा निवारा आणि त्यात कावळ्यांची संख्या ही जास्त . एरवी शाळेत मुले खिचडी खाताना बरीचशी सांडतात . त्या खिचडीचा कावळ्याना मोठा आधार वाटतो . या जमिनीवर सांडलेल्या खिचडीवर ताव मारताना कावळे दिसत असतात . मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत या कावळ्यांचे खरे हाल होतात . शाळेला सुट्टी असल्याने खिचडी शिजत नाही आणि पाणी ही उपलब्ध नसते . त्यामुळे या शाळेतील शिपाई बाळू अनेचा दररोज घरून धान्य आणि पोळ्या आणतात . हे धान्य आणि पोळ्याचे तुकडे कंपाउंडच्या भिंतीवर विखुरले की कावळे जमा होतात . आणि सगळ्या धान्याचा तसेच पोळ्यांचा फडशा पडतात . त्यांच्यासाठी एका डब्यात पाणी ही भरून ठेवलेले असते . दररोज दुपारी एक ही कावळ्यांना खाणे देण्याची वेळ ठरलेली असते . विशेष म्हणजे कावळे ही त्यावेळेला बरोबर जमा होतात .अनेचा याना आता कावळे ही चांगलेच ओळखू लागले आहेत . नव्हे तर त्यांची आणि अनेचा यांची चांगलीच गट्टी जमली आहे . लॉकडाऊनमुळे शाळा यावर्षी लवकर बंद झाली . मात्र अनेचा याच्याशी जमलेली दोस्ती या कावळ्यांना आधार देणारी ठरली एवढे मात्र खरे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close