क्राईमताज्या घडामोडी

नक्षलवादयांचे अयशस्वी प्रयत्न;150 जिलेटिन, 27 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरसह 20 किलो स्फोटके जप्त

शेअर करा

नक्षलवादयांचे अयशस्वी प्रयत्न;150 जिलेटिन, 27 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरसह 20 किलो स्फोटके जप्त

गोंदिया दि 27 डिसेंबर/प्रतिनिधी

नक्षलवादी पथकाने पेरून ठेवलेल्या भूसुरुंग शोधून काढण्यात गोंदिया पोलिसांना यश आले असून त्यांनी 150 जिलेटिन, 27 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरसह 20 किलो स्फोटके जप्त केली आहेत.

गोंदिया पोलिसांना गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलिस प्रशासनाने तत्परता दाखवत नक्षलवाद्यांचा मोठा हिंसक डाव उधळला.

जिलेटीन
नक्षलवाद्यांनी मोठी हिंसक घटना घडविण्यासाठी शनिवारी 26 डिसेंबर रोजी पोलिसांना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत गेंदुरझरिया डोंगराळ वन परिसरातील नक्षलवाद्यांनी बारमाई घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस प्रशासन कारवाई करत हे पेरलेले भूसुरुंग श्वान पथकाच्या साहाय्याने शोधून काढले.
पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, सालेकसा पोलिस स्टेशन प्रभारी बघेले, सी -60 सालेकसा कमांडो पथक, बीडीडीएस पथक व श्वान पथक व गेंदूर झारिया जंगल कॉम्प्लेक्सचे नक्षल ऑपरेशन सेल कर्मचारी यांनी मेटल डिटेक्टर व सुरक्षा उपकरणांसह शोध मोहीम राबविली.या वेळी धातू शोधकांकडून काही संशयास्पद सिग्नल सापडले,त्या भागाची बारीक तपासणी केली असता संकेतांच्या आधारे, आयईडी स्फोटके जमिनीच्या आत गाडलेली जागा खोदली. स्टीलच्या डब्यातून 150 जिलेटिन आणि प्लॅस्टिकच्या पोत्यात 27 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आढळून आले.
नक्षलवाद्यांनी पोलिस गस्तीवर प्राणघातक हल्ल्याच्या उद्देशाने हे 20 किलो स्फोटके जमिनीच्या आत लपवून ठेवलेले होते.
या भागात सक्रिय नक्षलवादी दलमशी संबंधित माओवाद्यांविरूद्ध सालेकसा पोलीस ठाण्यात हत्येचा कट रचल्याचा कलम 307, 120 (ब) षड्यंत्र , सह कलम 16, 20, 23 यूएपीए , सह कलम 4, 5 भारतीय विस्फोटक पदार्थ कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल करीत आहेत. यापूर्वी यावर्षी 27 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसंबी वनसंकुलातून अशीच स्फोटके सामग्री जप्त करण्यात आली होती, 3 महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

हेही वाचा:इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात १६ जण कोरोना पॉझिटिव्ह

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close