ताज्या घडामोडीशैक्षणिक

*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*

आभासी वर्ग सुरू होणार

शेअर करा

पुणे दि 12 जुलै टीमसीएम न्यूज

Advertisement

राज्यातील कोरोना संक्रमण पाहता प्रत्यक्षात शाळा सुरू होणे अजून शक्य नाही त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थने (scert) शिक्षकांसाठी ऑनलाईन गूगल क्लासरूम चा प्रशिक्षण आयोजित केला असून त्याव्दारे आभासी वर्ग सुरू करण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमांतर्गत SCERT प्रत्येक शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना मोफत G-Suite आय डी उपलब्ध करून देणार आहे.यामुळे शिक्षकांना एकाच वेळी २५० विद्यार्थ्यांची ऑनलाइन तासिका घेता येणार आहे. शिक्षकांसाठी G-Suite आय डी हे अनलिमिटेड असणार आहेत. तर विद्यार्थ्यांना ठराविक कालमर्यादा असणारे आय डी व पासवर्ड देण्यात येणार आहेत.ज्याचा वापर करून गुगल क्लासरूम च्या माध्यमाने ऑनलाइन वर्ग अध्यापन सुरु ठेवले जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय शासकीय शाळा व महाविद्यालयातील सुमारे ४०००० शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असून हे प्रशिक्षण ३ तासांचे असणार आहे. यासाठी शिक्षकांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आपल्या परिपत्रकात जाहीर केले आहे.
कोरोना संक्रमणामुळे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी शाळा मात्र बंदच आहेत. या काळातही मुलांचे शिक्षण निरंतर चालू राहण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शाळा व शिक्षकांच्या संपर्कात रहावे यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत गुगल क्लासरूम ची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जात आहे.

प्रशिक्षण नावनोंदणी : गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी इथे लिंक वरून नावनोंदणी करू शकता.

इच्छुक शिक्षकांनी सदर लिंक वर नावनोंदणी तात्काळ करावी. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया दि १३ जुलै रात्री ११.५५ वाजता बंद होणार आहे.

Advertisement
Tags

Related Articles

48 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: