ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*ईमेलला राज्यपालांचे उत्तर;40 मिनिटे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा*

शेअर करा

 

श्रीरामपूर दि 5 ऑक्टोबर ,प्रतिनिधी
तरुण शेतकऱ्याने शेतीच्या प्रश्नावर राज्यपालांना इमेल पाठवून भेटीची वेळ मागितली.तात्काळ राज्यपालांनी विनंती मान्य करून शेतकऱ्यांना भेट देऊन राजभवनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ४० मिनिटे चर्चा करुन अडचणी सोडविण्याचे आश्वासित केले.

Advertisement

शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नव्या-जुन्या अडचणींच्या संदर्भात भेटीबाबत जिल्ह्यातील खैरी निमगाव येथील संतोष भागडे या शेतकऱ्याने मेलवरून केलेल्या विनंतीची दखल घेऊन आदरणीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना भेटीसाठी राजभवनात बोलाऊन ४० मिनिटे चर्चा करीत कृषीविषयक समस्या समजावून घेतल्या.आणि त्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडे योग्य ती शिफारस करण्याचे आश्वासन दिले.
शेतमालाला हमीभाव, निर्यातबंदी,अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विजेचे सुलतानी वेळापत्रक, उत्कृष्ठ बियाणे आणि रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पिक विम्याची प्रभावीपणे होत नसलेली अंमलबजावणी, दुधाला मिळत नसलेला रास्त भाव, कोरोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांची झालेली आर्थिक हानी आदी प्रश्नांबाबत भागडे यांनी शासकीय पातळीवर तळमळीने पाठपुरावा केला पण त्यांच्या प्रयत्नाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट राज्यपाल महोदयांना भेटुन त्यांच्या मार्फत शेतीच्या या प्रलंबित समस्या सोडविण्याचा विचार भागडे यांच्या मनात आला. त्या इच्छेपोटी त्यांनी राजभवनात मेलद्वारे राज्यपालांना भेटण्यासाठी विनंती केली होती.त्याची दखल घेऊन राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी भेटीसाठी वेळ दिली होती.
खेड्यातील एका सामान्य तरूण शेतकऱ्याला राज्यपाल महोदयांनी भेटीसाठी वेळ देऊन सर्व प्रश्न निट समजावून घेत सुमारे ४० मिनिटे राजभवनात चर्चा केली.आणि सर्वसामान्य जनता आणि विशेषतः शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता दाखविल्याने भागडे यांच्यासह सोबत असलेले शेतकरी भारावुन गेले आहेत.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: