fbpx
ताज्या घडामोडी

*केमिकल टँकर आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक ; दोन्हीही जळून खाक*

शेअर करा

केमिकल टँकर आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक ; दोन्हीही जळून खाक*

Advertisement

सोलापूर प्रतिनिधी

केमिकल टँकर आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्हीही वाहने जळून खाक झाली. हा अपघात रविवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मोहोळ विजापूर महामार्गावर शहरापासून तीन किमी अंतरावर घडला. या अपघातात लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता एम.एच ६३ बी.पी. २९०८ हा केमिकल टँकर मोहोळ विजापूर महामार्गाने कुरुलच्या दिशेने निघाला होता. यावेळी मोहोळ पासून तीन किमी अंतरावर असलेल्या छावा ढाब्या शेजारील वळणात मोहोळच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरची (एच.आर ३८ यु. ६१२२) केमीकल टँकरला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यामुळे टॕकर मधील केमिकलची गळती होऊन दोन्ही वाहनाला भीषण आग लागली. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत वाहन चालकांना दरवाजा तोडून बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पोलिसांनी मोहोळ विजापूर महामार्गावरील वाहतूक रोखमुळे तब्बल चार किमी अंतरापर्यंत अवजड वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अविनाश शिंदे हे करीत आहेत.
दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाचे उपाधिक्षक प्रभाकर शिंदे, मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर भेट देऊन पाहणी केली.

 

हेही वाचा:*35 शिक्षक कोरोना बाधित ;शिक्षकांचा बाधित होण्याचा आकडा वाढतोय

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close