*पाथर्डी तालुक्यातील 27 रुग्ण कोरोना मुक्त*
*पाथर्डी तालुक्यातील 27 रुग्ण कोरोना मुक्त*

 

मनीष उदबत्ते
पाथर्डी दि 21 जुलै.

एकाच दिवशी 27 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत .या सर्व रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.कोरोनाचा संसर्ग झाल्याने हे रुग्ण बाधित झाले होते.त्यांच्यावर पाथर्डी येथे उपचार सुरू होते.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली.

पाथर्डी शहरातील मौलाना आझाद चौक 22,ग्रामीण भागातील अगसखांड 2,तिसगाव 2,त्रिभुनवाडी 1असे एकूण 27 रुग्ण संख्या आहे.पूर्णपणे कोरोनातून मुक्त झाले आहेत. बाधिताची संख्येत घट झाल्याने सर्वांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

सध्या पाथर्डी येथे 68 कोरोना बाधित तर अहमदनगर येथे 7 रुग्ण उपचार घेत आहेत.एकूण 75 कोरोनाचे रुग्ण आहेत.ह्या रुग्णांवर उपचार चालू आहे.मंगळवारी दि.21 जुलै रोजी कोरोना संशयित रुग्ण नसल्याने एकाही व्यक्तीचा कोरोना चाचणीसाठी स्वॉब घेण्यात आलेला नाही.

दरम्यान दुपारी एका तरुणाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याचा स्वॉब घेण्यात आलेला नाही.त्यामुळे पाथर्डी तालुका आणि शहरातील नागरिकांसाठी दुसऱ्या दिवशी ही दिलासादायक बातमी आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्येला ब्रेक लागला आहे.आज मितीला एक ही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.आज अखेर 377 व्यक्तीचे कोरोना चाचणीसाठीचे स्वॉब घेण्यात आले आहते.
उपजिल्हा रुग्णालयातील सोडण्यात आलेल्या 13 रुग्णांवर वैद्यकिय अधीक्षक डॉ अशोक कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ गीते, डॉ नवनाथ आव्हाड, परिचारिका सारिका तंमखाने,डी एन सोहनी, जे एस वराडे, कक्ष सेवक संजय ससाणे आदींनी रुग्णावर उपचार केले .कोविड 19 सेंटरच्या वसतिगृहातील 14 रुग्णांवर उपचार करण्यात आले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, डॉ महेंद्र बांगर यांच्या समवेत डॉक्टर्स ,आरोग्य सवेक यांचे पथक कोरोना रुग्णांसाठी कोव्हिडं 19 सेंटरवर कार्यरत आहे.

*पाथर्डी कोरोना रुग्णांची संख्या*

*उपचार सुरु असलेले रुग्ण 75*

*आता पर्यत बरे झालेले रुग्ण -57*

*मृत झालेले रुग्ण -00

*एकूण रुग्ण संख्या -132*

Share this story