*अंबेजोगाईच्या स्वारातीवैम”च्या कोवीड हाँस्पिटलची राज्य शासनाने घेतली दखल*
*अंबेजोगाईच्या स्वारातीवैम”च्या कोवीड हाँस्पिटलची राज्य शासनाने घेतली दखल*

 

सुदर्शन रापतवार

अंबाजोगाई, दि 11 मे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या  वतीने निर्माण करण्यात येणाऱ्या २५० खाटांच्या कोवीड हाँस्पिटल  निर्मितीची दखल राज्य शासनाच्या वैद्यकीयशिक्षण व औषधी द्रव्य विभागाने घेतली आहे. या कोवीड हाँस्पिटल निर्मितीचा व्हिडीओ त्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत ट्युटर आणि फेसबुक अकाऊंटवर व्हायरल केला आहे . इतर महाविद्यालयांनी या कामाचा आदर्श घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचीव डॉ. संजय मुखर्जी यांनी केले आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर इंडियन काँन्सिल आँफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सुचनांप्रमाणे अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कोवीड हाँस्पिटल डेडिकेटेड कोवीड हाँस्पिटल (डिसीएच) च्या निर्मिती संदर्भात या आठवड्यात विविध वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेवून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोवीड हाँस्पिटल निर्मितीच्या तयारीचे व्हिडीओ मागवण्यात आले होते. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाकडून आलेल्या व्हिडीओ क्लिपचे एका समितीकडून आवलोकन करण्यात आल्या नंतर अंबाजोगाई येथील स्वारातीवैम च्या कोवीड हाँस्पिटल निर्मितीचे काम राज्यात सर्वोत्कृष्ट असून इतर वैद्यकीय महाविद्यालयांनी या कामाचा आदर्श घ्यावा असे अवाहन वैद्यकीय शिक्षण व द्रव्य औषधी विभागाचे सचीव डॉ संजय मुखर्जी यांनी केले आहे.
अंबाजोगाई येथील स्वारातीवैम च्या कोवीड हाँस्पिटल निर्मितीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख, पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मोठे सहकार्य लाभले असुन त्यांच्या सहकार्याने जिल्हा विकास नियोजन विभागातुन २ कोटी ८० लाख रुपये जीवाणु तपासणी प्रयोगशाळेसाठी, ५० लाख रुपये आवश्यक यंत्रसामुग्री साठी, सामाजिक बांधिलकी फंडातून मानवलोकच्या वतीने २८ लाख रुपये, स्वारातीवैम च्या मार्डसंघटनेच्या वतीने ७ लाख रुपये, योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने ५ लाख रुपये, पाँवरग्रीडकार्पोरेशन तर्फे ३ लाख रुपये, आ. डॉ. नमिता अक्षय म़ुंदडा यांच्या वतीने १ लाख ५० हजार रुपये, राष्ट्रवादीकाँग्रेसच्या वतीने २.५० लाख रुपये, अंबाजोगाई कृउबा समितीच्या वतीने १ लाख रुपये, केज पंचायत समितीच्या वतीने ८० हजार रुपये अशी मदत वैद्यकीय महाविद्यालयास करण्यात आली असून या सर्वांच्या सहकार्याबद्दल तर कोवीड हाँस्पिटल निर्मितीचे काम अत्यंत दर्जेदार पध्दतीने व जलदगतीने केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय आभियंता जयवंत देशमुख यांचे सहकार्य लाभल्याबद्दल अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.

Share this story