अनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहीम
ॲनिमिया


जालना 

 दैनंदिन जीवनात जर पोषक आहार व योग्य उपचार घेतल्यास ॲनिमिया पासून निश्चितपणे बचाव होऊ शकतो.

या आजारापासून आपल्या कुटुंबासोबत आपले संपूर्ण गावच ॲनिमियामुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी करावा.

यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ॲनिमियामुक्त गाव मोहिमेची प्रभावीपणे जनजागृती करावी, अस आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. 


महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि आरोग्य विभाग  यांच्या संयुक्त विद्यमान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त

जालना तालुक्यातील विरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आज आयोजित कार्यक्रमात 'ॲनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमे'चा शुभारंभ

श्री. टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर होणार


माविमच्या सहयोगातून अनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमेचा आजपासून शुभारंभ होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून ॲनिमिया हा

आजार शरीरात कमी हिमोग्लोबिनचे प्रमाण असल्यावर होतो.  बालकांपासून ते वयस्कांपर्यंत सर्वांनाच हा आजार होऊ शकतो. यासाठी सर्वांनीच

विशेषत: महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ॲनिमिया हा आजार होऊच नये म्हणून  प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. पुरेसा

पोषण आहार, व्यायाम, योगासने यावर भर दयावा. आहारात जास्तीतजास्त लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रात वेळोवेळी

आपल्या रक्ताची तपासणी करुन हिमोग्लोबिनचे प्रमाण जाणून घ्यावे. कमी असल्यास वेळीच औषधोपचार घ्यावेत. सर्व शासकीय रुग्णालयात

रक्ताची तपासणी मोफत केल्या जाते. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या अनेक आरोग्याच्या योजना आहेत, त्याचाही सर्वसामान्यांनी लाभ घेऊन

आपले आरोग्य निरोगी ठेवावे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे

मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर

आदींची यावेळी उपस्थिती होती.

Share this story