Corona breaking *ब्रेकिंग न्यूज :नगरमध्ये आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह एकूण 8*

 

अहमदनगर दि 31 मार्च टीम सीएमन्यूज

त्या दोन परदेशी व्यक्तींच्या सानिध्यात आलेल्या आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह असलयाचे रिपोर्ट आज जिल्हा प्रशासनाला मिळाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली .

जामखेड येथील मस्जिद मध्ये परदेशी नागरिक धार्मिक कामासाठी आले होते या दोघांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने जामखेड येथील तीन मस्जिद आणि परिसर सील केला होता या दोघांमच्या संपर्कात आलेल्या तीन  जणांना लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत .अहमदनगर मध्ये जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधितांची संख्या ०8 झाली असून पैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे .यापूर्वी आढळून आलेल्या मध्ये दोन परदेशी नागरिक असून एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. आज एकूण २८ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले त्यातील २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत .नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा,स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे जिल्हावासियाना आवाहन आहे .

Share this story