*बीड मध्ये आज दोघांचा मृत्यू;कोरोना संक्रमणाची कोरोना योद्धयांवर संक्रांत*
*बीड मध्ये आज दोघांचा मृत्यू;कोरोना संक्रमणाची कोरोना योद्धयांवर संक्रांत*

 

बीड दि २१ जुलै टीम सीएम न्यूज

बीड जिल्ह्यात कोरोनाचे  संक्रमण वाढत आहे. या संक्रमणाची वक्र दृष्टी आता कोरोना योद्ध्यांवर पडत आहे. कोरोना संक्रमणाची कोरोना योद्धयांवर संक्रांत आलेली दिसत आहे.आज झालेल्या मृत्यू मध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील ४० वर्षीय अधिपरिचारिका  यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती कोरोना बाधित होताना दिसत आहेत.

 

बीड जिल्ह्यातील आज आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात काम करण्याऱ्या २५ वर्षीय महिला डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आष्टी तालुक्यातील खिळद येथे आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाने धामणगाव येथे एका खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचार घेतले होते, तो वैद्यकीय व्यावसायिक संसर्गामुळे कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.बीड जिल्हा रुग्णालयातील ३८ वर्षीय महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयातील ११ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते.  त्यामुळे एकूणच संक्रमण हे वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत पोहचत आहे. ४० वर्षीय अधिपरिचारिका  यांचा उपचारादरम्यान मृत्यू होणे ही दुर्दैवी घटना आहे.

*बीडचे वाढते कोरोना मीटर;26 कोरोना पॉझिटिव्हची भर,तिघांचा मृत्यू*

आज झालेल्या मृतांमध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील ४० वर्षीय अधिपरिचारिका  यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बीड येथील ६२ वर्षीय  पुरुष औरंगाबाद येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांना बीड येथे पहाटे आणण्यात आले होते.ते मृत अवस्थेत रुग्णालयात पोहचले. तर गेवराई येथील ६५ वर्षीय महिला अत्यावस्थ आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

Share this story