*सार्स कोरोना-2 विषाणू संक्रमण कल चाचणीसाठी आयसीएमआर तर्फे बीड जिल्ह्यातील आठ गावे आणि दोन शहरांची निवड*
*सार्स कोरोना-2 विषाणू संक्रमण कल चाचणीसाठी आयसीएमआर तर्फे बीड जिल्ह्यातील आठ गावे आणि दोन शहरांची निवड*

 

बीड दि, 21 मे टीम सीएमन्यूज

कोरोना विषाणू संक्रमण पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने कोविड-19 विषाणूचा समुदायातील प्रसार व त्याच्या विस्ताराची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने रा‍ष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांतर्गत बीड जिल्हयातील विविध गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे . या संबंधीची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली .

अधिक वाचा

*बीड जिल्ह्यात 13 नवीन कोरोना बाधितांची भर;बीड@29* https://cmnews.co.in/13-new-corona-cases-in-beed-district-spreading-in-corona-majalgaon-dharur/

या सर्वेक्षणासाठी आयसीएमआर संस्थेने जिल्ह्यातील 8 गावांची आणि दोन शहरांरांची निवड केली आहे .या मधील सुमारे चाळीस व्यक्तींची रँडम पध्दतीने निवड करून रँडम पध्दतीने व्यक्तींची निवड करुन पथक संबधितांना सर्वेक्षणाबद्दल मार्गदर्शन करुन त्यांची संमती प्राप्त करून संबधित व्यक्तीची आणि त्याच्या परिवाराची पार्श्वभूमी, घराचा तपशील, संबधितांचा वैद्यकीय इतिहास याविषयी प्रश्न विचारुन भविष्यातील संशोधनासाठी आवश्यक माहिती पथकातर्फे यावेळी संकलित करणार आहेत.

या गावात होणार सर्वेक्षण
1.परळी शहर
2.बीड शहर
3.हिंगणी तालुका आष्टी
4.तेलगाव तालुका माजलगाव
5.चंदन सावरगाव तालुका केज
6.नांदगाव तालुका अंबेजोगाई
7.आमला तालुका गेवराई
8.पांगरी तालुका शिरूर कासार
9.पिंपळनेर तालुका बीड
10.मोहा तालुका परळी.

Share this story