*बीडमध्ये दोघां कोरोना मुक्तांची केक कापून बँड पथकाच्या सलामीने घरी बिदाई*
*बीडमध्ये दोघां कोरोना मुक्तांची केक कापून बँड पथकाच्या सलामीने घरी बिदाई*

 

बीड दि 27 मे टीम सीएमन्यूज

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दररोज वाढ होत असताना ,कोरोना मुक्तीचा क्षणाची बीडकर वाट पाहत होते.राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोना मुक्तीचा जल्लोष साजरा करण्यात आला.तसाच जशन साजरा करण्याचा क्षण बीडकरांना मिळाला आणि त्यांनी बँडची धून आळवत केक कापत दोन कोरोना मुक्त व्यक्तींची बिदाई केली.

*बीडमध्ये दोघां कोरोना मुक्तांची केक कापून बँड पथकाच्या सलामीने घरी बिदाई*

दहा दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील इटकुर येथील १४ वर्षीय मुलगी व माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते .त्यांना आज 10 दिवस पूर्ण होऊन 11 व्या दिवशी त्यांचे स्वब निगेटिव्ह आल्याने त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले .
जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षातील सुरुवातीला या दोघांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले . सर्व बाधित रुग्ण आपल्या कक्षाच्या बाहेर उभे राहिले होते .त्यानंतर त्यांना बाहेर पाठविण्यात आले .

हे ही वाचा

बीड जिल्ह्यात दिवसभरात 8 आणखी बाधितांची भर; बाधित रुग्णांची संख्या@55

अनेक दिवसांपासून कोरोना मुक्तीचा क्षण साजरा करण्याची बीडकर वाट पाहत होते .
आरोग्य प्रशासनाने या दोघांचा कोरोना मुक्ती दिन साजरा करण्यासाठी केक आणला होता.तर त्यांच्या बिदाई साठी पोलीस बँड ची साथ लाभली .सामाजिक अंतराचे भान ठेवत कोविड कक्षातून हे दोघे बाहेर आल्यानंतर,दोघांच्या हाताने केक कापून उभ्या असलेल्या अंबुलन्स मध्ये बिदाई करण्यात आली .उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची लढाई जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.उपस्थित नागरिक ,स्टाफ नर्स यांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रेरणा दिली .
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार डॉ सुखदेव राठोड ,डॉ जयश्री बांगर यांच्या सह आदी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

Share this story