ओमायक्रोन चे राज्यात २६ नवीन बाधित
ओमायक्रोन

मुंबई

राज्यात आज ओमायक्रोन सर्वेक्षण बद्दलची माहिती प्राप्त झाली आहे. आज राज्यात ओमायक्रोन संसर्गाचे २६  रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये मुंबईमधील ११  ,रायगड पनवेल मनपा  ५, ठाणे मनपा ४, नांदेड २ आणि नागपूर पालघर भिवंडी-निजामपूर मनपा प्रत्येकी एक असे एकूण २६  रुग्ण ओमायक्रोन चे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता राज्यात व ओमायक्रोन बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १६७  इतकी झाली आहे.

राज्यातील ७२ जणांना आज घरी सोडण्यात आले. या बाधित आलेल्या २६ मधील १९ जणांचे लसीकरण झालेले आहे तर उर्वरित ७ जणांचे बाकी आहे. यामध्ये १४ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.

Share this story