*सर्वात मोठ्या विस्तारित प्लाझ्मा थेरेपीच्या उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार-राज्यमंत्री अमित देशमुख*
*सर्वात मोठ्या विस्तारित प्लाझ्मा थेरेपीच्या उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार-राज्यमंत्री अमित देशमुख*

 

अंबेजोगाई दि 26 टीम सीएमन्यूज

राज्यात येत्या सोमवारी सर्वात मोठ्या विस्तारित प्लाझ्मा थेरेपी च्या उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून बीड आणि अंबेजोगाई येथे प्लाझ्मा बँकिंग सुरू करणार असल्याचे राज्याचे आरोग्य राज्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले .
या वेळी विधान परिषद सदस्य संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार ,जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे आज आरोग्य राज्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना लॅब लवकरच केली जाणार असून त्याला आपण तत्त्वतः मंजुरी देत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात आरोग्य विभागातील पदभरतीला शासनाने मंजुरी दिली आहे.त्यामुळे व्यवस्थेत बदल होत असून बळकटीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात प्रशासनाचे प्रयत्न आणि सूचनांचे नागरिकांनी केलेले पालन यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगून प्रशासनाचे कौतुक केले.

Share this story